Mumbai Metro 3 Aqua line Underground Route : मुंबईतील वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेट्रोचे जाळे (Metro Network) वेगाने विस्तारले जात आहे. याच मालिकेतील महत्त्वाचा टप्पा म्हणून मुंबई मेट्रो-3 ची सेवा गुरुवारपासून मुंबईकरांच्या सेवेत रुजू होत आहे. हा मार्ग कफ परेड ते आरे पर्यंत धावणार आहे. 'मेट्रो 3' सुरू झाल्यानंतर दक्षिण मुंबई (South Mumbai), वरळी, बीकेसी, धारावी आणि आरे या भागातील नागरिकांसाठी ही मेट्रो गेम चेंजर ठरणार आहे. येथील प्रवाशांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.
मेट्रो-3 (ॲक्वा लाईन) ची प्रमुख वैशिष्ट्ये
मुंबई मेट्रो लाईन 3 ला 'ॲक्वा लाईन' (Aqua Line) म्हणूनही ओळखले जाते. ही मेट्रो पूर्णपणे भूमिगत (Underground) असून, गुरुवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे.
मार्ग आणि स्थानके: कफ परेड ते सीप्झ/आरे या दरम्यानचा प्रवास यामुळे सुसाट होणार आहे. पहिल्या टप्प्यात विज्ञान केंद्र, महालक्ष्मी, सीएसएमटी, हुतात्मा चौक आणि चर्चगेट यासह 11 भूमिगत स्थानके प्रवाशांसाठी सुरू होणार आहेत.
प्रवासाचा वेग: आरे आणि कफ परेड दरम्यानचा प्रवासासाठी सध्या दोन तासांचा जो वेळ लागतो, तो या मेट्रोमुळे फक्त एक तासात पूर्ण होणार आहे.
वाहतूक कोंडीत घट: या मेट्रोमुळे रस्त्यावरील गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, ज्यामुळे रस्त्यावरील गर्दी सुमारे 35 टक्केपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे.
तिकिटाची किंमत : मेट्रोचे तिकिटही फार असणार नाही. 10 रुपयांपासून 70 रुपयांपर्यंत या तिकिटाचा दर असण्याची शक्यता आहे.
प्रवाशांचा अंदाज: 33.5 किमी लांबीच्या या भूमिगत मेट्रोमुळे वाहतूक कोंडी कायमची संपेल. या मार्गावरून दररोज 17 लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे.
हेही वाचा - Underwater Tunnel: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील समुद्राखालील बोगदा जपानच्या 'सेकान' बोगद्याला देणार टक्कर; काय असेल खास? जाणून घ्या
या भागांना मिळणार सर्वात मोठा फायदा
मेट्रो-3 मुळे दक्षिण मुंबई आणि उत्तर मुंबई हे दोन्ही महत्त्वाचे भाग जोडले जाणार आहेत, ज्यामुळे अनेक भागांमध्ये कनेक्टिव्हिटी (Connectivity) सुधारेल आणि प्रवासाचा वेळ वाचेल.
दक्षिण मुंबई: कफ परेड, चर्चगेट, काळबादेवी यांसारख्या अति-गर्दीच्या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल.
व्यवसायाचे केंद्र: बीकेसी (BKC) आणि वरळी हे मुंबईतील दोन प्रमुख व्यावसायिक भाग थेट जोडले जातील, ज्यामुळे या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी प्रवासाचा एक मोठा पर्याय उपलब्ध होईल.
उत्तरेकडील क्षेत्र: आरे आणि सीप्झ (SEEPZ) या निवासी आणि औद्योगिक क्षेत्रांना जलद कनेक्टिव्हिटीचा फायदा होणार आहे.
दाट वस्ती: धारावी आणि सीतालादेवी या दाट लोकवस्तीच्या भागातील प्रवासासाठी हा एक नवीन आणि जलद पर्याय ठरणार आहे.
अन्य मेट्रो मार्गांशी कनेक्टिव्हिटी
मेट्रो-3 (ॲक्वा लाईन) सध्या सुरू असलेल्या आणि भविष्यात सुरू होणाऱ्या अनेक मेट्रो मार्गांना जोडली जाणार आहे. यामुळे संपूर्ण शहरात कनेक्टिव्हिटी वाढेल:
ठिकाण जोडला जाणारा मेट्रो मार्ग
मरोळ नाका - लाईन 1 (ब्लू लाईन)
आरे जेव्हीएलआर - लाईन 6 (गुलाबी लाईन)
सीएसएमटी - लाईन 7 अ (रेड लाईन) आणि लाईन 8 (गोल्ड लाईन)
बीकेसी - लाईन 2बी (यलो लाईन)
दादर, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड आणि चर्चगेट वेस्टर्न लाईन (Western Line)
हेही वाचा - Navi Mumbai Airport: पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन; पहिलं उड्डाण कोणती एअरलाईन करणार?