POD Taxi: मुंबईकरांमागील ट्रॅफिकची साडेसाती संपणार! देशातील पहिल्या ‘पॉड टॅक्सी’चा शुभारंभ,आता वांद्रे ते कुर्ला अंतर अवघ्या काही मिनिटांत

मुंबईत देशातील पहिला पॉड टॅक्सी प्रकल्प वांद्रे ते कुर्ला मार्गावर सुरू होणार आहे.

POD Taxi: मुंबईकरांमागील ट्रॅफिकची साडेसाती संपणार! देशातील पहिल्या ‘पॉड टॅक्सी’चा शुभारंभ,आता वांद्रे ते कुर्ला अंतर अवघ्या काही मिनिटांत

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वाहतूक कोंडी ही मोठी समस्या राहिली आहे. मेट्रो प्रकल्पांमुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी आता मुंबईत देशातील पहिल्या ‘पॉड टॅक्सी’ प्रकल्पाचे भूमिपूजन होणार असून, दळणवळण क्षेत्रात हे एक मोठे पाऊल मानले जात आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

या पॉड टॅक्सी प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे 8.85 किलोमीटर असून या मार्गावर 22 स्थानके उभारली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील काम 3.36 किलोमीटर लांबीचे असून, ही सेवा वांद्रे ते कुर्ला या महत्त्वाच्या मार्गावर सुरू होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील स्थानके

पहिल्या टप्प्यात खालील प्रमुख स्थानकांचा समावेश असणार आहे:

कुर्ला एलबीएस रोड, एमएमआरडीए ‘पे अँड पार्क’, जी ब्लॉक, बीकेसी (BKC) गेट क्रमांक 11, वांद्रे कलानगर, जुनी एमएमआरडीए इमारत, उत्पादन शुल्क विभाग परिसर

हेही वाचा: Ration Card Reactivation : रेशन कार्ड बंद झालंय तर चिंता नको; करा घरबसल्या अपडेट, जाणून घ्या सविस्तर प्रक्रिया

तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण

भूमिपूजनानंतर या प्रकल्पाच्या कामाला तातडीने सुरुवात होणार असून तीन वर्षांत हा प्रकल्प पूर्ण होण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

प्रवासाचा खर्च

पॉड टॅक्सी सेवेसाठी प्रवाशांना अंदाजे प्रति किलोमीटर 21 रुपये मोजावे लागू शकतात, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईतील विशेषतः बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. एकूणच, पॉड टॅक्सी प्रकल्पामुळे मुंबईकरांना जलद, सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार असून शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: Stock Market Today: ट्रम्प यांच्या एका डेडलाईनने दणाणला दलाल स्ट्रीट; सेन्सेक्स 950 अंकांनी कोसळला, निफ्टीनेही गटांगळ्या खाल्ल्या

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number