Mumbai-Pune Expressway Toll Free : मुंबई-पुणे हायवेवर तीन दिवस टोल भरावा लागणार नाही, पण केवळ ‘या’ लोकांनाच मिळणार मुभा

लोणावळ्यात एकविरा देवीची यात्रा मंगळवार, बुधवार व गुरुवार अशी तीन दिवस संपन्न होणार आहे. या यात्रेनिमित्त मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन दिवस टोल माफी करण्यात आली आहे. या टोल माफिसाठी खासदार सुरेश म्हात्रे  यांचे टोल माफीचे पत्र आवश्यक असणार असून हे पत्र टोल नाक्यांवर दाखविल्यास एकविरा भक्तांसाठी टोल माफ होणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार […]

Mumbai-Pune Expressway Toll Free :  मुंबई-पुणे हायवेवर तीन दिवस टोल भरावा लागणार नाही, पण केवळ ‘या’ लोकांनाच मिळणार मुभा

लोणावळ्यात एकविरा देवीची यात्रा मंगळवार, बुधवार व गुरुवार अशी तीन दिवस संपन्न होणार आहे. या यात्रेनिमित्त मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर तीन दिवस टोल माफी करण्यात आली आहे. या टोल माफिसाठी खासदार सुरेश म्हात्रे  यांचे टोल माफीचे पत्र आवश्यक असणार असून हे पत्र टोल नाक्यांवर दाखविल्यास एकविरा भक्तांसाठी टोल माफ होणार असल्याची माहिती भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे. 

लोणावळा येथे आगरी-कोळी समाजासह विविध जाती-धर्माचे लोक एकविरा देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जात असतात. यंदा देवीची यात्रा 24 एप्रिलपासून मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या तीन दिवशी संपन्न होणार आहे. 

भाविकांच्या मागणीचा विचार करुन आणि भावनांचा आदर करत खासदार बाळ्या मामा म्हात्रे यांनी टोल प्रशासनाकडे टोल माफीची मागणी केली होती. त्यानुसार, खासदाराचे पत्र असल्यास ही टोलमाफी होणार आहे. 

दरम्याने, एक्सप्रेस वे टोल प्रशासनाने आपली टोल माफीची विनंती ऐकली असून तीन दिवस ही टोल माफी सुरू राहणार आहे, एकविरा देवीच्या भक्तांनी वाहतूक नियमांचे व सुरक्षिततेचे पालन करून यात्रेस यावे अशी विनंती देखील खासदार सुरेश म्हात्रे  यांनी एकविरा देवी भक्तांना केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number