Mumbai-Pune Expressway : सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरायला निघालात? त्याआधी मुंबई–पुणे एक्सप्रेसवरील गाड्यांची लांबच लांब रांग पाहा

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई - पुणे एक्सप्रेसवरील खालापूर टोलनाक्यावर रविवारी सकाळपासून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे.

Mumbai-Pune Expressway : सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी फिरायला निघालात? त्याआधी मुंबई–पुणे एक्सप्रेसवरील गाड्यांची लांबच लांब रांग पाहा

सलग सुट्ट्यांमुळे मुंबई – पुणे एक्सप्रेसवरील खालापूर टोलनाक्यावर रविवारी सकाळपासून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे. अनेक तास वाहनांच्या रांगा लागल्याने अखेर वाहनचालकांनी जुन्या महामार्गावरून वाहनांचा ताफा वळविल्याने पेण – खोपोली रस्त्यावरील साजगांव फाटा, शिळफाट्यावर वाहतुककोंडी झाली आहे .बोरघाटात वाहनांची रांग लागल्याने अनेक वाहने बंद पडल्याने घाट जाम झाला आहे.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाला शनिवार, रविवार आणि सोमवार अशी सलग तीन दिवस सुट्टी असल्याने मुंबई महानगर, उपशहरातील लोक पुण्याकडे सुट्टी साजरा करण्यासाठी निघाले आहेत. मुंबई – पुणे एक्सप्रेसवरील खालापूर टोलनाक्यावर शनिवारी सकाळपासून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहतूक कोंडी झाली आहे.

हेही वाचा- Bhiklya Ladkya Dhinda : तारप्याचा सूर घुमला सातासमुद्रापार! जव्हारच्या दुर्गम भागातील भिकल्या धिंडांना ‘पद्मश्री’; 80 वर्षांच्या साधनेचा सन्मान
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा घाट परिसरात वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. काही ठिकाणी चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहने अडकून पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. नेहमी दोन ते अडीच तासांत पूर्ण होणारा प्रवास अनेक प्रवाशांना चार ते पाच तासांहून अधिक वेळ घेत असल्याचे दिसून आले. यामुळे प्रवाशांचा संयम सुटत असून उष्णता, तहान आणि थकवा यांचा सामना करावा लागत आहे तर महामार्ग पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number