Mumbai Rain : उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा! अनेक परिसरात पावसाची हजेरी

आज सकाळी मुंबई आणि उपनगरांत अवकाळी पाऊस पडला. सकाळपासूनच शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण होतं.

Mumbai Rain : उकाड्याने हैराण मुंबईकरांना दिलासा! अनेक परिसरात पावसाची हजेरी

जून महिना संपत आला आहे, मात्र अजूनही महाराष्ट्रात सर्वदूर मान्सूनचा पाऊस झाला नसल्यानं चिंता वाढली आहे. सर्वांचेच डोळे आता पावसाकडे लागले आहेत. अशातच मुंबईतील पावसाबाबात एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत मान्सूनच्या आगमनाची शक्यता आहे. आज सकाळी मुंबई आणि उपनगरांत अवकाळी पाऊस पडला. सकाळपासूनच शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण होतं. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात सकाळी 5 वाजल्यापासून अवकाळी पावसाच्या जोरदार सरी पडल्या. 

हेही वाचा- Satyajeet Tambe: 'नाशिक-पुणे सरळ रेल्वे मार्ग रद्द केल्यास जनआंदोलन उभारू…'; आमदार सत्यजित तांबे यांचा रेल्वे प्रशासनाला कडक इशारा

आज सकाळी शहरातील अनेक भागांमध्ये पडलेल्या पावसामुळे वातावरणात सुखद बदल जाणवला. थंडगार वाऱ्यांसह आलेल्या सरींनी नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा दिला आहे.पहाटेपासूनच आकाशात काळे ढग जमा होऊ लागले आणि काही ठिकाणी रिमझिम तर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या  यलो अलर्ट जारी केला असून, शहरात वादळी वारे, गडगडाट, आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मुंबईत अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. तसेच 23 जूनपासुन मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्मिती होणार असल्याची शक्यता आहे. गुरुवार दिनांक 25 जून ते बुधवार दिनांक 1 जुलै  दरम्यानच्या जुनच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईसह संपूर्ण कोकणात जोरदार मान्सूनची शक्यता ही कायम आहे. मुंबईतील दिवसाच्या दमट व रात्रीच्या उकाड्यापासुन मुंबईकरांना दिलासा कधीपासून मिळू शकतो.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number