मुंबई : कोकणात जलवाहतुकीचा नवीन अध्याय सुरू झाला आहे. मुंबईतून निघालेली सागरी रो-रो सेवा विजयदुर्ग बंदरापर्यंत पोहोचली आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई कोकण सागरी रो रो सेवा आता सुरू झाली आहे. मुंबई ते विजयदुर्ग अशी रो पॅक्स प्रवासी बोट पहिल्यांदाच विजयदुर्ग किनाऱ्याला आली आहे. तब्बल 45 वर्षानंतर कोकणात पहिल्यांदाच प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेली आज एम टू एम रो-रो प्रवासी वाहतूक सेवा याचा शुभारंभ भाऊचा धक्का येथे झाल्यानंतर आज विजयदुर्ग बंदर येथे तब्बल सहा तास दाखल झाले आहे. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी शुभारंभ केला. माजी मंत्री भाई गिरकर, माजी आमदार प्रमोद जठार व प्रवासी यांचे आगमन हे विजयदुर्ग बंदरात झालेले पाहायला मिळाले. ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजीत हे स्वागत करण्यात आले. बंदर जेट्टीला पूर्ण फुलांची सजावट करण्यात आली असून मोठ्या प्रमाणात स्वागतासाठी हजारो कोकणवासीय दखल झाले होते.
हेही वाचा : Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्याकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा; म्हणाल्या, 'अजितदादांची इच्छा होती की...'