Vikhroli Girl Death: विक्रोळी हादरली; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात स्पीकर पडून भीषण दुर्घटना, तीन वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचा आरोप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Vikhroli Girl Death: विक्रोळी हादरली; प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात स्पीकर पडून भीषण दुर्घटना, तीन वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई (विक्रोळी): काल देशभरात 26 जानेवारीचा उत्साह, देशभक्तीपर गीतांचा सुरआणि तिरंग्याची आन – बाण – शान पाहायला मिळत असतानाच, मुंबईतील विक्रोळी परिसरातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त लावण्यात आलेला एक अवजड ध्वनिक्षेपक (स्पीकर) अंगावर पडल्याने तीन वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेडकर नगर परिसरात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या आवाजाचे साऊंड बॉक्सेस उभारण्यात आले होते. 26 जानेवारीच्या सकाळी परिसरात उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान, ही तीन वर्षांची मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक उंचावर ठेवलेला एक अवजड स्पीकर थेट तिच्या अंगावर कोसळला. हा आघात इतका भीषण होता की चिमुकली गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

हेही वाचा: Weather Alert: आजपासून 3 दिवस राज्यात पाऊस? कुठे कडाक्याची थंडी तर कुठे पावसाचे सावट; तुमच्या शहरात कसे राहणार हवामान, जाणून घ्या

निष्काळजीपणाचा बसला फटका?

या दुर्दैवी घटनेमागे एका चिंध्या गोळा करणाऱ्या व्यक्तीचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित व्यक्ती स्पीकरच्या रचनेजवळ जाताना दिसत असून, त्याने स्पीकरच्या आधाराला किंवा वायरला धक्का दिल्यामुळे तोल जाऊन स्पीकर खाली पडल्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. यामुळे स्थानिक रहिवासी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

पोलीस तपास आणि कारवाई

या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. या घटनेमुळे सार्वजनिक उत्सव, मिरवणुका आणि कार्यक्रमांमध्ये उभारण्यात येणाऱ्या मांडव, स्टेज आणि साऊंड सिस्टीमच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका निष्काळजीपणामुळे निष्पाप जीव गमावावा लागणे ही गंभीर बाब असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर नियम आणि जबाबदारी निश्चित करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा: India Europle Trade Deal: दोन दशकांचा वनवास संपला; भारत – युरोप मध्ये ऐतिहासिक 'मदर ऑफ ऑल डिल्स'; जागतिक व्यापारात होणार मोठी उलथापालथ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number