नागपूर: नागपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून कारमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपी साहिल मनोहर चंदेल याला अटक करण्यात आली आहे.
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून नागपूरात कारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी आरोपी साहिल मनोहर चंदेल याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला कारमध्ये बेलतरोडी परिसरात नेऊन अत्याचार केला. आरोपी ड्रायव्हर असून, त्याच्या मोठ्या भावाच्या लग्नात पिडीतेशी त्याची ओळख झाली होती. अत्याचाराचा विरोध करताना ती जखमी झाली. ही संपूर्ण तिने कुटुंबीयांना सांगितली. त्यानंतर सदर प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आणि अखेर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा: पीओपीच्या मोठ्या गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत अद्याप तोडगा नाहीच; सुनावणी 24 जुलैपर्यंत तहकूब
15 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अत्याचा केल्याचा प्रकार घडला आहे. नागपुरात ही घडना घडली आहे. नागपुरातील बेलतरोडी परिसरात अल्पवयीन मुलीला घेऊन जाण्यात आले आणि कारमध्येच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. अत्याचाराला विरोध करताना पीडित मुलगी जखमी झाली. घरी गेल्यानंतर मुलीने आपबीती कुटुंबियांना सांगितली. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी साहिल चंदेल याला अटक केली. आरोपी साहिल हा ड्रायव्हर असून पीडित मुलीशी त्याची मोठ्या भावाच्या लग्नात ओळख झाली होती.