Wednesday, February 18, 2026 05:44:09 PM

BMC Election Cash Seized: नालासोपाऱ्यात मतदानापूर्वीच 'लक्ष्मी दर्शन'? पेल्हार पोलिसांनी मध्यरात्री जप्त केली रोकड, काय आणि कसं घडलं?

कोणतीही कागदपत्रे नसल्याने दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, निवडणूक लाच प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

bmc election cash seized नालासोपाऱ्यात मतदानापूर्वीच लक्ष्मी दर्शन पेल्हार पोलिसांनी मध्यरात्री जप्त केली रोकड काय आणि कसं घडलं

मुंबई: येत्या 15 जानेवारीला महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान होत असून, नालासोपाऱ्यात निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. आचारसंहितेचा कडक अंमलबजावणी सुरू असतानाच पेल्हार पोलिसांनी मोठी कारवाई करत 10 लाख नऊ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण वसई-विरार पट्ट्यात खळबळ उडाली असून निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

मध्यरात्रीची थरारक कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, पेल्हार पुलाच्या परिसरात गुरुवारी आणि शुक्रवारी दरम्यानच्या मध्यरात्री गस्त घालत असताना पोलिसांना दोन तरुण दुचाकीवरून संशयास्पदरित्या जाताना दिसले. रात्री अडीच वाजेच्या सुमारास जेव्हा संपूर्ण परिसर शांत असतो, तेव्हा हे दोन तरुण ॲक्टिव्हा गाड्यांवरून घाईघाईने निघाले होते. संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना अडवले आणि झडती घेण्यास सुरुवात केली.

हेही वाचा: Chhatrapati Sambhajinagar Election 2026 : छत्रपती संभाजीनगरमध्ये अटीतटीची लढत, जाणून घ्या कोणत्या प्रभागात किती उमेदवार?

प्लास्टिक पिशवीत सापडली रोकड

पोलिसांनी जेव्हा या तरुणांची तपासणी केली, तेव्हा त्यांच्याकडे असलेल्या एका प्लास्टिक पिशवीत नोटांचे पाकिटे सापडली. प्राथमिक मोजणीत ही रक्कम 10 लाख नऊ हजार रुपये इतकी असल्याचे निष्पन्न झाले. या रकमेबाबत जेव्हा पोलिसांनी चौकशी केली, तेव्हा दोन्ही तरुणांकडे कोणतेही अधिकृत कागदपत्र किंवा स्पष्टीकरण नव्हते. परिणामी, पोलिसांनी ही सर्व रोकड आणि त्यांच्या दोन्ही ॲक्टिव्हा गाड्या तात्काळ जप्त केल्या आहेत.

राजकीय आरोप-प्रत्यारोप

निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले असताना इतकी मोठी रक्कम सापडल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. "ही रक्कम मतदारांना प्रलोभन देण्यासाठी वाटली जाणार होती," असा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र, सत्ताधारी पक्षाने हे सर्व आरोप राजकीय षडयंत्र असल्याचे सांगत फेटाळून लावले आहेत. या कारवाईमुळे मतदारांमध्ये मात्र संभ्रमाचे आणि चर्चेचे वातावरण आहे.

कायदेशीर पाऊल आणि पोलिसांचा तपास

पेल्हार पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही संशयित तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 173 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही रक्कम नक्की कोणाची होती आणि ती कोणापर्यंत पोहोचवली जाणार होती, याचा छडा लावण्यासाठी पोलीस आता सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींच्या कॉल रेकॉर्ड्सची सखोल तपासणी करत आहेत. 

हेही वाचा: Bacchu Kadu on Bawankule: बावनकुळेंच्या खाणींचा आणि 'जगदंबा ट्रॅव्हल्स'चा काय आहे संबंध? आरोप करत बच्चू कडूंनी बावनकुळेंची नसच दाबली


सम्बन्धित सामग्री