Nashik Crime News : मुलांना दत्तक दिले की विक्री?; 14 मुलांना जन्म देणाऱ्या महिलेवर संशय, पोलिसांचा तपास सुरू

पोलिस आणि इका समितीने तपास सुरू केला असून कुटुंबीयांच्या जबाबांतील विसंगतीमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

Nashik Crime News : मुलांना दत्तक दिले की विक्री?; 14 मुलांना जन्म देणाऱ्या महिलेवर संशय, पोलिसांचा तपास सुरू

नाशिक: त्र्यंबकेश्वर परिसरातून मुलांची विक्री केल्याचा संशय व्यक्त करणारी धक्कादायक माहिती समोर येत असून, या प्रकरणाने प्रशासन आणि पोलिस यंत्रणेला सतर्क केले आहे. बरड्याच्या वाडीमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तब्बल 14 मुलांना जन्म दिल्याचे समोर आले होते. यापैकी काही मुले तिच्याकडे नसल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ चौकशी सुरू केली आणि संबंधित महिला तसेच तिच्या कुटुंबीयांना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतले.

घटनेचे स्वरूप गंभीर असल्याने पोलिसांनी चौकशीसाठी ‘इका समिती’ स्थापन केली. समितीचे सदस्य सर्वेक्षणासाठी संबंधित घरात पोहोचले असता तिथे संशय अधिक गडद करणारी माहिती मिळाली. सर्वेक्षणासाठी वजनकाटा ठेवून बाळ आणण्यास सांगितल्यावर मुलांच्या आईने सांगितले की बाळ त्यांच्याकडे नाही. बाळ कुठे आहे, कोणाला दिले याबाबत विचारले असता त्यांनी कोणतेही नाव किंवा पत्ता सांगण्यास नकार दिला. आठ दिवसांपूर्वी बाळ दिल्याचे मात्र त्यांनी कबूल केले.

हेही वाचा: Raosaheb Danve: बोगस मतदानावरून राजकारण तापलं; रावसाहेब दानवेंचा शिंदे गटाच्या आमदारावर थेट प्रहार, म्हणाले…

या संपूर्ण प्रकरणावर जय महाराष्ट्र न्यूजने मुलांच्या आईशी संवाद साधला असता, तिने एक वेगळेच स्पष्टीकरण दिले. आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे मुलांचे संगोपन करता येत नसल्याने बाळ दत्तक दिल्याचे ती म्हणाली. तिने तीन मुलांना भाऊबंदामध्येच दत्तक दिल्याचा दावा केला. “खंडवी म्हणून इसम आहेत, ते आमचेच नातेवाईक आहेत, त्यांनाच मुलं दिली,” असेही ती महिला म्हणाली. मात्र, कोणतीही दत्तक प्रक्रिया अधिकृत मार्गाने करण्यात आल्याचे कोणतेही पुरावे समोर आलेले नाहीत.

त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाकडे संभाव्य बालकविक्री किंवा अवैध दत्तक प्रक्रियेचा संशय ठेवून तपास आणखी वाढवला आहे. समिती सध्या कुटुंबीयांच्या जबाबांमधील विसंगती आणि प्रत्यक्षात दिलेल्या मुलांचे ठिकाण यांचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, मुलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी पोलिस व संबंधित विभागांकडून विशेष चौकशी केली जात आहे.

हेही वाचा: India Vs South Africa : तिन्ही फॉर्मेटमध्ये विकेट्सचं शतक करणारा पहिला भारतीय गोलंदाज, ‘या’ पठ्ठ्याने रचला नवा रेकॉर्ड

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number