नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या स्वागतासाठी 25 ते 31 ऑक्टोबरदरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात सामूहिक शंखनाद, ग्राम आणि गोदावरी महाआरती हे कार्यक्रम या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण आहेत. यातील शंखनाद करण्यास सुरुवात झाली आहे.
नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर गोदातीरावर विश्वविक्रम रचण्यात आला. गोदातीरी तब्बल 501 नागरिकांनी एकाच वेळी सामूहिक शंखनाद केला. या ऐतिहासिक क्षणाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमस्थळी 303 हून अधिक शंख एकाच वेळी वाजले, तर एकूण 550 हून अधिक नागरिक या विक्रमी सोहळ्यासाठी उपस्थित होते. शेकडो शंखांच्या एकत्रित नादाने संपूर्ण गोदातीर दुमदुमून गेले.या सामूहिक शंखनादाने कुंभमेळ्याच्या मंगलमय सुरुवातीचा शंखनादच झाला आहे, अशी भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर-
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update