Sunday, June 15, 2025 11:25:20 AM

कुंभमेळा 2027: त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील अमृतस्नानाच्या तारखा जाहीर; सविस्तर माहिती जाणून घ्या

नाशिक व त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027 साठी अमृतस्नानाच्या तारखा जाहीर; लाखो भाविकांच्या आगमनासाठी सुरक्षा, वाहतूक, निवास व स्वच्छतेचे सुसूत्र नियोजन सुरू.

कुंभमेळा 2027 त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथील अमृतस्नानाच्या तारखा जाहीर सविस्तर माहिती जाणून घ्या

नाशिक: कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे होणाऱ्या अमृतस्नानाच्या अधिकृत तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दर १२ वर्षांनी येणाऱ्या या महाकुंभ पर्वाचे संपूर्ण देशभरातून लाखो भाविक वाट पाहत असतात. यंदाच्या कुंभमेळ्यात धार्मिक विधी, स्नान आणि अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन अधिक भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्याचा प्रशासनाचा निर्धार आहे.

त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहण सोहळ्याने कुंभ पर्वाची सुरुवात करण्यात येणार असून खालीलप्रमाणे अमृतस्नानाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत:

पहिले अमृतस्नान : 2 ऑगस्ट 2027 

द्वितीय अमृतस्नान : 31 ऑगस्ट 2027

तृतीय अमृतस्नान : 12 सप्टेंबर 2027

या तीनही दिवशी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये गोदावरी नदीत स्नान करून पुण्य लाभ घेण्यासाठी गर्दी करणार आहेत. यासाठी सुरक्षेपासून ते वाहतुकीपर्यंत सर्व पातळ्यांवर नियोजन करण्यात येत आहे.

हेही वाचा: जवळा ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय : जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास घरपट्टी व ग्रामपंचायत कर माफ

नाशिक येथेही कुंभस्नानाचे वेगळे महत्त्व आहे. येथील ध्वजारोहण सोहळा 31 ऑक्टोबर 2026 रोजी पार पडणार आहे. त्यानंतर पुढील अमृतस्नानाच्या तारखा खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत:

पहिले अमृतस्नान : 2 ऑगस्ट 2027 

द्वितीय अमृतस्नान : 31 ऑगस्ट 2027 

तृतीय अमृतस्नान : 11 सप्टेंबर 2027 

नाशिकमध्येही गोदावरीच्या तीरावर हे महत्त्वाचे स्नान विधी पार पडतील. राज्य शासन, जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, महापालिका, आणि विविध धार्मिक संस्था यांचा समन्वय साधून संपूर्ण कुंभ पर्व सुचारू पार पाडण्यासाठी नियोजन सुरू आहे.

यावेळी स्नानासाठी देशभरातून लाखो भाविक, साधू-संत आणि पर्यटक नाशिक व त्र्यंबकेश्वरला येणार असल्याने शहरात स्वच्छता, वाहतूक, निवास व्यवस्था, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, आपत्कालीन व्यवस्थापन आदी सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.

प्रशासनाने भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि अध्यात्मिक वातावरण देण्याचे आश्वासन दिले असून, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही एक महत्त्वपूर्ण पर्व मानला जातो. 


सम्बन्धित सामग्री