नाशिककरांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. नाशिक शहरात शनिवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. शहरातील जलवाहिन्यांवरील गळती शोधणे आणि दुरुस्तीच्या कामांसाठी महापालिकेने हा निर्णय घेतलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, याचा फटका हा पूर्व, पश्चिम, नाशिकरोड, पंचवटी, सातपूर तसेच सिडको या सहाही विभागांना बसणार आहे. शहरातील प्रमुख जलवाहिन्यांवरील गळती शोधून दुरुस्तीची ही कामे केली जाणार आहेत. शनिवारी सकाळी 6 ते 12 वाजेपर्यंत ही कामे सुरु राहतील. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना आवाहन केलेले आहे की, शुक्रवापरपासूनच पाण्याचा वापरण्यासाठी पुरेसा साठा करुन ठेवावा, जेणेकरुन गैरसोय टाळता येणार आहे.