नवी मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 ऑक्टोबर रोजी उद्घाटन केलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Navi Mumbai International Airport – NMIA) उड्डाणे 25 डिसेंबर 2025 रोजी ख्रिसमसच्या मुहूर्तावर सुरू होण्याची शक्यता आहे. NMIA कडून अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु अकासा एअरलाइनने आपली फ्लाइट बुकिंग सेवा सुरू करताच प्रवाशांचा उत्साह वाढला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात NMIA वरून 4 शहरांसाठी सेवा उपलब्ध असेल, दिल्ली, गोवा, कोची आणि अहमदाबाद. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा एक विशेष उद्देश वाहन (Special Purpose Vehicle) म्हणून Navi Mumbai International Airport Limited (NMIAL) यांनी विकसित केलेला प्रकल्प आहे. तब्बल 1160 हेक्टर क्षेत्रावर उभे राहिलेले हे विमानतळ दोन धावपट्ट्यांसह दरवर्षी 9 कोटी प्रवासी हाताळू शकते. NMIA आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळून मुंबईची एकूण प्रवासी क्षमता 150 कोटींपर्यंत वाढणार आहे.
अकासा एअरलाइनने X वर पोस्ट करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणे सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली. त्यांच्या पोस्टनुसार, 25 डिसेंबर रोजी दिल्ली नवी मुंबई ही पहिली फ्लाइट NMIA वर उतरणार असून हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. त्यामुळे अकासा एअरलाइन NMIA वरून सेवा सुरू करणाऱ्या पहिल्या विमान कंपन्यांपैकी एक बनेल. 25 डिसेंबरसाठी अकासा एअरलाइनने एक विशेष फ्लाइट जाहीर केली आहे: फ्लाइट QP 1831 दिल्लीहून सकाळी 5.25 वाजता सुटेल आणि सकाळी 8.10 वाजता नवी मुंबई विमानतळावर उतरेल. परतीची फ्लाइट QP 132 नवी मुंबईहून सकाळी 8.50 वाजता सुटेल. या मार्गाचे एका फेरीचे भाडे शुक्रवारी सुमारे 6000 रुपये होते.
Thrilled to announce the launch of our operations from the all-new @navimumairport (NMIA)! ✈️ Our maiden flight from Delhi to Navi Mumbai will land at NMI on 25th December 2025, marking a historic milestone. With this, Akasa Air becomes one of the first airlines to commence… pic.twitter.com/8tZVLXBPve — Akasa Air (@AkasaAir) November 15, 2025
Times of India च्या माहितीनुसार, NMIA वर सुरुवातीला 12 तासांचे ऑपरेशन राहील. सकाळी 8 ते दुपारी 8. काही उड्डाणे रोज उपलब्ध असतील, तर काही विशिष्ट दिवसांनाच. दिल्ली, गोवा आणि कोचीसाठी प्रवाशांना दिवसभर विविध वेळांच्या सेवा मिळतील. कोची आणि गोव्यासाठी काही फ्लाइट आठवड्यात फक्त ठराविक दिवशीच चालतील. दिल्ली आणि अहमदाबाद मार्ग तुलनेने नियमित असेल.
अहमदाबादसाठीची विशेष सेवा 31 डिसेंबर पासून सुरू होईल. 25 डिसेंबर वगळता, दिल्ली – नवी मुंबई फ्लाइट सकाळी 8.50 ला NMIA वर उतरेल, तर नवी मुंबई – दिल्ली फ्लाइट सकाळी 10.55 वाजता सुटेल. उड्डाणाचे वेळापत्रक, बुकिंग आणि भाडे याबद्दल सविस्तर माहिती प्रवाशांना अकासा एअरलाइनच्या अधिकृत वेबसाइट, मोबाइल अॅप किंवा त्यांच्या ट्रॅव्हल एजंटकडून मिळू शकते.