Nesco Drug Case : नेस्को ड्रग प्रकरणाचा अमेरिकेशी संबंध? 20 जणांचा ‘9X9’ व्हॉट्सॲप ग्रुप, सुरक्षा सूचनांकडे दुर्लक्ष…; धक्कादायक खुलास्याने खळबळ

मुंबईतील नेस्को ड्रग्ज प्रकरणात आता फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. याप्रकरणी पोलिसांचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसे नवनवीन खुलासे होत आहेत.

Nesco Drug Case : नेस्को ड्रग प्रकरणाचा अमेरिकेशी संबंध? 20 जणांचा ‘9X9’ व्हॉट्सॲप ग्रुप, सुरक्षा सूचनांकडे दुर्लक्ष…; धक्कादायक खुलास्याने खळबळ

मुंबईतील नेस्को ड्रग्ज प्रकरणात आता फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित धागेदोरे समोर येऊ लागले आहेत. याप्रकरणी पोलिसांचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसे नवनवीन खुलासे होत आहेत. दरम्यान नुकताच नेस्को ड्रग्ज प्रकरणातील आरोपपत्रात महत्त्वाचा तपशील समोर आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी रोजी एक्स्टसीच्या गोळ्या असलेले एक पार्सल अमेरिकेतील फ्लोरिडा येथील लोकप्रिय ऑनलाइन महिला फॅशन रिटेलर 'हॉट मियामी स्टाइल्स इंक' मार्फत बुक करण्यात आले होते. इतकचं नव्हे तर ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील वयवर्ष 23 असलेल्या दीपेश हेमवानी या तरुणाच्या नावे पाठवण्यात आले होते.

यानंतर यूपीएसचे ऑपरेशन्स मॅनेजर सचिन पाठक यांनी वनराई पोलिसांना मोठी माहिती देत सांगितले की, प्रत्येकी 84.50 अमेरिकी डॉलर किमतीचे दोन मिडी ड्रेस असल्याचे घोषित केलेले हे पार्सल, एमिरेट्सच्या ईके 500 (EK 500) विमानाने अमेरिकेतून दुबई आणि नंतर मुंबईला आले होते. पार्सल मार्गाचा मागोवा घेतल्यानंतर समोर आले की, सहार कार्गो कुरिअर टर्मिनलवर सीमाशुल्क मंजुरी मिळाल्यानंतर, ते 12 फेब्रुवारी रोजी जोगेश्वरी येथील युनायटेड पार्सल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडच्या सुविधेत पोहोचले.

हेही वाचा- Pakistan Drone Infiltration : 15 ऑगस्टपूर्वी पाकिस्तानचा मोठा कट उघड; पंजाब सीमेवर ड्रोनद्वारे घुसखोरीचा प्रयत्न फसला, मोठा शस्त्रास्त्रांचा साठा जप्त

दुसऱ्या दिवशी, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह दिनेश कामेरकर यांनी कंपनीच्या पेमेंट सिस्टमद्वारे 12,350 रुपये घेऊन ते उल्हासनगर पोलीस स्टेशनमागील, अमृतसाई अपार्टमेंटमधील फ्लॅट 403 येथे हेमवानी यांना पोहोचवले. यानंतर गोरेगाव पूर्व येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात तैनात असलेल्या बाऊन्सर्ससह आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांचा धक्कादायक जबाब समोर आला. त्यात त्यांनी म्हटलं होत की, त्यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ विकताना आणि सेवन करताना पाहिले होते. त्यांनी नेस्कोच्या लाइव्ह इव्हेंट्सचे उपाध्यक्ष बाळकृष्ण कुरुप आणि इव्हेंट मॅनेजर सनी जैन यांना सावध देखील केले होते. मात्र त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. 

एक्स्टसीचे सेवन केल्यामुळे आजारी पडलेल्या एका विद्यार्थिनीने म्हटलं की, प्रतीक पांडे आणि रौनक खंडेलवाल यांनी '9X9' नावाचा 20 सदस्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपद्वारे प्रत्येकी 1,650 रुपयांना एमडीएमएच्या गोळ्या विकल्या गेल्या. दरम्यान या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांना आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या रॅकेटशी संबंधित इतर लोकांचा शोध सुरू आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number