स्वारगेट प्रकरणात नवा वाद, आरोपीच्या वकिलांच्या वक्तव्यामुळे खळबळ!

यालयात या संदर्भात कोणताही युक्तिवाद झाला नसतानाही वकिलाने केलेल्या बेताल वक्तव्यामुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.

स्वारगेट प्रकरणात नवा वाद, आरोपीच्या वकिलांच्या वक्तव्यामुळे खळबळ!

पुण्यातील स्वारगेट एसटी बस स्थानकात 25 फेब्रुवारी रोजी पहाटे 5.30 वाजता एका 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना पीडितेच्या चारित्र्यावर शंका उपस्थित करणारे वक्तव्य केले. विशेष म्हणजे, न्यायालयात या संदर्भात कोणताही युक्तिवाद झाला नसतानाही वकिलाने केलेल्या बेताल वक्तव्यामुळे प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. या प्रकारामुळे पीडितेला मानसिक त्रास सहन करावा लागत असून, वकिलाच्या या वागणुकीवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी दत्तात्रय गाडे याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली. त्यानंतर न्यायालयात हजर केल्यानंतर ॲड. वजिद खान-बिडकर, ॲड. साजिद शाह आणि ॲड. सुमित पोटे यांनी आरोपीचे वकीलपत्र घेतले. मात्र, सुनावणीनंतर न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना ॲड. पोटे यांनी ‘आरोपीने पीडितेला 7500 रुपये दिले होते,’ असा दावा केला. आश्चर्याची बाब म्हणजे, न्यायालयात हा मुद्दा कधीही मांडला गेला नव्हता. त्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी पीडितेचे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आरोप होत आहेत.

वकिलांनी माध्यमांसमोर चुकीची माहिती दिल्यामुळे पीडितेच्या बाजूने असलेली सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. बुधवारी (दि. 12) झालेल्या सुनावणीनंतर ॲड. पोटे यांनी माध्यमांशी बोलताना, 'न्यायालयात ७५०० रुपयांचा कुठलाही युक्तिवाद झालेला नाही,' असे स्पष्ट केले. आरोपीने आम्हाला ही माहिती दिली आणि त्यावरून आम्ही बोललो, अशी सारवासारव त्यांनी केली. मात्र, या वक्तव्यामुळे पीडितेला समाजमाध्यमांवरून मानसिक छळाचा सामना करावा लागत आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे आरोपीच्या वकिलांची भूमिका संशयास्पद बनली आहे. आरोपीच्या बचावासाठी कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन वकिलांनी खोटी माहिती देणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे. या प्रकरणात खोटी माहिती पसरवून पीडितेचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलांवर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number