महाराष्ट्राला आणखी एक स्लीपर वंदे भारतची भेट; ‘या’ शहरातून धावणार एक्स्प्रेस

Sleeper Vande Bharat : महाराष्ट्राला आणखी एक स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहे. ही ट्रेन मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत धावणार आहे. या सेवेमुळे महाराष्ट्र-कर्नाटकदरम्यान रात्रीचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.

महाराष्ट्राला आणखी एक स्लीपर वंदे भारतची भेट; ‘या’ शहरातून धावणार एक्स्प्रेस
New Sleeper Vande Bharat Express

बंगळुरु ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांसाठी एक गुड न्यूज आहे. बहुप्रतिक्षित असलेली बंगळुरु-मुंबई ही स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस लवकरच धावण्याची चिन्हे आहेत. रेल्वे बोर्डाने या एक्स्प्रेससाठी दोन स्लीपर रेक मंजून केले आहेत शिवाय ही गाडी आठवड्यातून 6 दिवस चालवण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे.

महाराष्ट्रातील ‘या’ शहरातून जाणार मार्ग
लवकरच या विशेष उद्घाटन फेरीनंतर नियमित ही सेवा सुरु होणार आहे. मात्र, या आनंदाच्या बातमीमध्ये पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर कर्नाटकातील प्रवाशांसाठी मोठी निराशा आहे. कारण रेल्वे बोर्डाने प्रस्ताविक केलेला मार्ग हा सोलापूरमार्गे असणार असून, पुणे-मिरज-हुबळी या मुख्य मार्गाला वगळण्यात आलेले आहे.

हेही वाचा-मुंबई-ठाणे प्रवास अधिक सुसाट; 50 मिनिटांचा टप्पा 25 मिनिटांवर, MMRDA ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

रेल्वे बोर्डाच्या पत्रानुसार ही एक्सप्रेस बंगळुरु,धर्मावरम,वाडी, कलबुर्गी, रायचूर,गुंतकल, अनंतपूर,सोलापूर,पुणे, कल्याण, सीएसएमटी अशा स्थानंकावर धावणार आहे. या नव्या मार्गामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, मिरज शिवाय बेळगावी, हुबळी, धारवाड,दावणगेरे या महत्त्वाच्या शहरांना थेट कनेक्टिव्हिटी मिळणार नाही.

ही सर्व शहरे औद्यागिक, व्यापारी आणि शैक्षणिकदृष्टत्या अत्यंत महत्त्वाशी आहेत, त्यामुळे पुणे, सातारा, सांगली, मिरज, बेळगाव, हुबळी या मार्गाचा विचार करावा तसेच प्रस्तावित मार्गाचा फेरविचार करावा, अशी जोरदार मागणी आता सांगली, कोल्हापूर तसेच बेळगावातील प्रवासी संघटनांकडून होत आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number