Thursday, July 17, 2025 03:01:31 AM

'सामना'च्या पहिल्या पानावर राज ठाकरेंची फोटोसह बातमी

सामना वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर राज ठाकरेंची फोटोसह बातमी आली आहे. बातमीत राज ठाकरे यांनी दादा भुसेंचा भुसा केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

सामनाच्या पहिल्या पानावर राज ठाकरेंची फोटोसह बातमी

मुंबई:  सामना वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर राज ठाकरेंची फोटोसह बातमी आली आहे. बातमीत राज ठाकरे यांनी दादा भुसेंचा भुसा केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सामनात पहिल्या पानावर ठाकरे बंधूंच्या बातम्या पाहायला मिळाल्या आहेत. 

गुरुवारी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे त्रिभाषा सूत्रांविषयी राज ठाकरे यांच्या भेटीला गेले होते. यावेळी भुसे यांचा प्रस्ताव आम्हाला मान्य नाही असे मनसे सर्वेसर्वा राज यांनी म्हटले. तसेच 5 जुलैला हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या मोर्चात उद्धव ठाकरेंनाही बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चा रंगल्या. 

हेही वाचा : Wedding Dates in 2025: लग्नाचा मुहूर्त कधी सुरु होईल आणि पहिल्या पाच पत्रिका कोणत्या क्रमाने वाटायच्या?

ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार अशी एक्स पोस्ट खासदार संजय राऊत यांनी केली आहे. हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल असेही राऊत यांनी म्हटले आहे. 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहे. संजय राऊतांकडून ठाकरे बंधूंचा फोटोही पोस्ट करण्यात आला आहे. त्यानंतर खासदार संजय राऊत यांची आणखी एक पोस्ट पाहायला मिळाली. या पोस्टमध्ये ठाकरे हा ब्रँड आहे असे त्यांनी सांगितले आहे. तसेच या पोस्टमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना टॅग करण्यात आले आहे. 

दरम्यान राऊतांनी केलेल्या एक्स पोस्टवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भाष्य केले आहे. "मराठी भाषेवर ज्याप्रमाणे आक्रमक होते. त्यानुसार मराठी माणसांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ⁠राज यांनी संजय राऊत यांना कॉल केला. त्यानुसार 5 तारीख ठरली. सर्व साहित्यिक, कलाकार, मराठी माणस एकत्र येतील. ⁠मराठी भाषेवर अन्याय होत असताना मराठी माणसांची ताकत हा संदेश देशाला जाणे गरजेचे होते. ⁠हे सकारात्मक पाऊल आहे. ⁠राज ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन राऊत यांना कॉल केले. राजकीय पक्षाशी संपर्क साधणार आहेत. मराठी भाषेवर प्रेम करणारे सर्व राजकीय पक्ष कलाकार एकत्र येतील. राज ठाकरेंनी व्हिडीओ ट्विट केला होता, त्याचा अर्थ समजले आहे. 5 तारखेचा मोर्चा निघणार आहे. मराठी भाषेसाठी जेलमध्ये जायची त्यारी आहे. अस्वलाच्या अंगावर जेवढे केस आहेत त्यापेक्षा जास्त केसेस मनसेच्या कार्यकर्त्यांवर आहे", असे देशपांडे यांनी म्हटले आहे.  


सम्बन्धित सामग्री