पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात अखेर निलेश चव्हाणला अटक करण्यात आली आहे. बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी नेपाळमधून निलेशला ताब्यात घेतलं आहे. तो दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमधून नेपाळला पोहचला.
निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिष्मा हगवणे हिचा मित्र आहे. त्याने वैष्णवीच्या बाळाला कस्पटे कुटुंबियांना देण्यास नकार दिला. तसेच त्यांना बंदुकीचा धाक दाखवत हाकलून लावले. तसेच ते बाळ त्याच्या घरीही नव्हते. एका अत्रात व्यक्तीने ते कस्पटे कुटुंबियांना दिले. हे बाळ निलेशकडे कसे? आणि त्याचा या प्रकरणाशी काय संबंध हे तपासण्यासाठी पोलीस निलेशच्या शोधात होते. मात्र तो गेल्या काही दिवसांपासून फरार होता. मात्र त्याला आज बावधन पोलिसांनी नेपाळमधून अटक केली आहे.
हेही वाचा : रवी वर्माच्या चौकशीत धक्कादायक खुलासे उघड
विकृत निलेश चव्हाण नेमका नेपाळला कसा पोहोचला?
10 दिवसानंतर निलेश चव्हाणला बेड्या ठोकल्या आहेत. बावधन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. निलेश चव्हाण नेपाळमध्ये लपून बसला होता. निलेश पुण्यातून दिल्लीला कारने गेला. दिल्लीतून दुसऱ्या कारने उत्तर प्रदेशातील गोरखपूरला गेला. गोरखपूरमधून निलेश नेपाळला पोहोचला. नेपाळमधील भैरवा जिल्ह्यातील एका गावात दबा धरून बसला. भैरवा जिल्ह्यातील एका लॉजमध्ये निलेश लपून बसला होता. निलेशवर वैष्णीच्या बाळाची हेळसांड केल्याचा आरोप आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर बाळ काही दिवस निलेशकडे होते. बाळ ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबीयांना निलेशनं बंदुकीचा धाक दाखवल्याचाही आरोप त्याच्यावर आहे.