Court On Molestation: नऊ वर्षांपूर्वी दिलेलं ‘फ्लाईंग किस’ आता पडलं महागात; मुंबई न्यायालयाकडून नराधमाला 3 वर्षांचा तुरुंगवास

मुंबईतील विशेष न्यायालयाने या प्रकरणात आरोपीला दोषी ठरवत 3 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

Court On Molestation: नऊ वर्षांपूर्वी दिलेलं ‘फ्लाईंग किस’ आता पडलं महागात; मुंबई न्यायालयाकडून नराधमाला 3 वर्षांचा तुरुंगवास

Court On Molestation: एका 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिला 'फ्लाईंग किस' देणे एका तरुणाला नऊ वर्षांनंतर चांगलेच महागात पडले आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने या प्रकरणात आरोपीला दोषी ठरवत 3 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. आरोपी आता विवाहित असून त्याला 3 महिन्यांचे बाळ असले, तरी गुन्ह्याचे गांभीर्य पाहून न्यायालयाने त्याला कोणतीही सवलत देण्यास नकार दिला. 

काय होते नेमके प्रकरण?
ही घटना 2017 च्या सुरुवातीला घडली होती, जेव्हा आरोपी 19 वर्षांचा होता. पीडित मुलगी तिच्या शिकवणी वर्गाला जात असताना आरोपीने तिचा हात धरून ओढले होते. भीतीपोटी मुलीने ही गोष्ट कोणाला सांगितली नव्हती. मात्र, त्यानंतर एका स्थानिक 'हळदी-कुंकू' समारंभादरम्यान आरोपीने पुन्हा त्या मुलीला पाहून 'फ्लाईंग किस' दिले. हे कृत्य एका शेजाऱ्याने पाहिले आणि मुलीच्या आईला माहिती दिली. जेव्हा पीडितेच्या वडिलांनी आरोपीला समजावण्यासाठी बोलावले, तेव्हा त्याच्या कुटुंबाने उलट पालकांशीच गैरवर्तन केले, ज्यामुळे अखेर पोलिसांत एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला.

'फ्लाईंग किस हा केवळ हावभाव नाही, तर लैंगिक संकेत'
सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की, 'फ्लाईंग किस' देणे हा नृत्यातील एक सामान्य हावभाव आहे. मात्र, विशेष न्यायाधीशांनी हा युक्तिवाद फेटाळून लावला. न्यायालयाने स्पष्ट केले की, "अशा प्रकारे फ्लाईंग किस देणे हे स्पष्टपणे लैंगिक संकेत आहेत. हे कृत्य केवळ पीडितेला त्रास देणारे नसून तिच्या प्रतिष्ठेचे आणि विनयशीलतेचे थेट उल्लंघन आहे." न्यायालयाने नमूद केले की, आरोपीच्या वकिलांच्या युक्तिवादाने हे कृत्य झाल्याचे अप्रत्यक्षपणे मान्यच केले आहे. 

हेही वाचा – Hyderabad Biryani Scam : हैदराबाद बिर्याणीच्या नावाखाली 70 हजार कोटींचा झोल; आयकर विभागाच्या चौकशीत मोठा खुलासा

कठोर दंड आणि शिक्षा
आरोपीने शेजाऱ्यांशी असलेल्या जुन्या वैमनस्यातून आपल्याला अडकवल्याचा दावा केला होता. परंतु, न्यायालयाने हा दावा फेटाळून लावताना म्हटले की, कोणताही पालक आपल्या मुलीची प्रतिष्ठा केवळ शेजाऱ्याच्या वादासाठी पणाला लावणार नाही. अखेर, न्यायालयाने आरोपीला 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला. हा निकाल सार्वजनिक ठिकाणी महिलांशी असभ्य वर्तन करणाऱ्यांसाठी एक मोठा धडा मानला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number