केंद्र सरकारने ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. यावेळी ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाच्या चर्चेदरम्यान शिवसेना खासदार अरविंद सावंत बोलत असताना भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन अत्यंत वैयक्तिक आक्षेपार्ह विधान केले, त्यामुळे संसदेत चांगलाच गदारोळ झाला. खासदार अरविंद सावंत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत निशिकांत दुबे यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. अरविंद सावंत केंद्र सरकारवर टीका करीत असतानाच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन अत्यंत वैयक्तिक आरोप केला. यावेळी संसदेत चांगलाच राडा झाला.