राज्यातील 23 नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. राज्यातील 20 नगरपरिषदांची मतदान प्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्यामुळे उच्च न्यायालयाकडून सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिलेले. दरम्यान या निवडणुकांची मतमोजणी रविवारी, 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू झाली आहे. याचपार्श्वभूमिवर आज होणाऱ्या नगर परिषदा आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालाचा कौल मतदारराजा कोणाच्या नावाने देणार हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे. काही जागांचे कल येण्यास सुरूवाती झाली असून काही ठिकाणी धक्कादायक निकाल समोर आले आहेत.
अशातच तळकोकणातील सर्वांचे लक्ष मालवण, कणकवली नगरपंचायतीच्या मतमोजणीकडे लागलेले होते. कारण कणकवलीमध्ये भाजप विरुद्ध सर्व राजकीय पक्ष एकत्र अशी निवडणुक लढवण्यात आली. ज्यात कणकवलीमध्ये निलेश राणेंच्या पाठिंबामुळे ठाकरे गटाचे संदेश पारकर विजयी झाले असून नितेश राणेंना धक्का बसला. तसेच पाठोपाठ मालवणमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अर्थात राणे बंधूंमध्ये संघर्ष पहायला मिळाला होता.
हेही वाचा- Kankavli Sandesh Parkar : निलेश राणेंमुळे ठाकरे गटाचा उमेदवार विजयी, नितेश राणेंना धक्का
तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या ममता वराडकर यांनी मालवण नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे. दम्यान तळकोकणातील मालवण नगरपरिषदेत एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेने नगराध्यक्षासह 20 पैकी तब्बल 10 नगरसेवक निवडून आणले. भाजप उमेदवाराचा त्यांनी जवळपास 1019 मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे मालवणमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणने भाजपच्या कमळाला चारी मुंड्या चित केलं आहे.
कोकणातील मुख्य लढती पाहायच्या झाल्या तर कोकणातील सावंतवाडीत भाजपच्या श्रद्धा सावंत- भोसले, शिवसेना शिंदे गटाच्या नीता सावंत- कविटकर, शिवसेना ठाकरे गटाच्या सीमा मटकर, काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांच्यात लढत रंगलेली आहे. तसेच कणकवली नगरपरिषदत भाजपचे समीर नलावडे, शिवसेना ठाकरे गटाचे आणि व शिंदे शिवसेना शहर विकास आघाडीच उमेदवार संदेश पारकर यांच्यात लढत रंगलेली ज्यात निलेश राणे यांच्या पाठिंबामुळे शिवसेनेच्या संदेश पारकर यांचा विजय झाला आहे. तप दुसरीकडे मालवणमध्ये नितेश राणे आणि निलेश राणे या दोन भावांमध्ये जुंपली पाहायला मिळत असून भाजपच्या शिल्पा खोत, शिवसेना शिंदे गटाच्या ममता वराडकर आणि शिवसेना ठाकरे गटाच्या पुजा करलकर यांच्यात चुरस रंगलेली ज्यात ममता वराडकर विजयी झाल्या.