‘ऑक्टोबर हिट’च्या तडाक्याने नागरिक हैराण; पारा 38 अंश सेल्सिअसवर; पुढील 3 दिवसांत नेमकं काय घडणार?

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे.
‘ऑक्टोबर हिट’च्या तडाक्याने नागरिक हैराण; पारा 38 अंश सेल्सिअसवर; पुढील 3 दिवसांत नेमकं काय घडणार?
Maharashtra temperature rise

Maharashtra Weather Report: महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीचा प्रवास वेगाने सुरू झाला असून, त्याचा थेट परिणाम वातावरणावर दिसून येत आहे. राज्यात ‘ऑक्टोबर हिट’चा प्रभाव वाढला असून उन्हाचा तीव्र तडाखा आणि असह्य उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील बहुतांश शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा 35 अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे. यंदा मान्सूनने 19 सप्टेंबर रोजी नेहमीपेक्षा दोन दिवस उशिराने परतीचा प्रवास सुरू केला होता. सध्या मान्सूनची परतीची रेषा परभणी, ब्रह्मपुरी, बारामती आणि हर्णे या भागांतून जात असून, आगामी 2 ते 3 दिवसांत मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील उर्वरित भागांतून मान्सून पूर्णपणे माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणात रत्नागिरीत सर्वाधिक तापमानाची नोंद

मागील 24 तासांच्या आकडेवारीनुसार, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल 38.0 अंश सेल्सिअस या राज्यातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल मुंबईतील कोलाबा येथे 37.4 अंश सेल्सिअस, तर मालेगाव, जळगाव आणि अमरावती येथे 37.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय अकोला येथे 37.1 अंश सेल्सिअस, तर छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर भागात पारा 37.0 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. सकाळपासूनच पडणाऱ्या कडक उन्हामुळे ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा – मुंबई ते कोकण-पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार सोपा; विशेष रेल्वेची घोषणा, थांबे कोणते?

पुढील 3 दिवस किनारपट्टीवर दमट वातावरण

हवामान विभागाने दिलेल्या पुढील 3 दिवसांच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि अत्यंत दमट हवामान कायम राहील. त्यामुळे या भागातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. दुसरीकडे, उर्वरित महाराष्ट्रात आकाश मुख्यत्वे ढगाळ न राहता कोरडे राहील आणि तीव्र उन्हाची लाट कायम राहील. मान्सूनच्या पूर्ण माघारीनंतरच वातावरणात काहीसा बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version