ऑक्टोबर हिटचा कहर! राज्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी; तापमान आणखी वाढणार

राज्यभरातील नागरिकांना ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागत आहे.

ऑक्टोबर हिटचा कहर! राज्यात उष्णतेचा यलो अलर्ट जारी; तापमान आणखी वाढणार
October Heatwave

राज्यभरातील नागरिकांना ऑक्टोबर हिटचा सामना करावा लागत आहे. कारण यावर्षी पुरेशा प्रमाणात सरी न बरसल्यामुळे ही उष्णता आणखीनच वाढली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच उष्णता वाढल्याने परतीच्या पावसाने देखील धूम ठोकली आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार राज्यातील 6 जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र आज मुंबईसह ठाणे, पालघर व कोकणात उकाडा प्रचंड वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. त्यामुळे नागरिकांना ऑटोबरच्या सुरुवातीलाच उष्णतेच्या तीव्र तडाख्याचा सामना करावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिन्याच्या सुरवातीला हीट वाढणार असून तापमान 34 ते 35 डिग्री सेल्सियस जाण्याची शक्यता वर्तवली जातेय. राज्यात मान्सूनने पुरेपूर तोंड फिरवले असून नागरिकांना या उष्णतेच्या यलो अलर्टचा सामना करावा लागतोय. तसेच पुढील काही दिवसांत मुंबईसह कोकणाचे हवामान उष्ण व दमट असू शकते, असे सांगण्यात आले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number