वर्ध्यात स्वातंत्र्यदिनाच्या आनंदावर विरजण आल्याचे समोर आले आहे. वर्ध्यातील हिंगणघाट येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त झेंडावंदन करून घरी जात असताना तीन तरुणींचा भीषण अपघात मृत्यू झाल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यदिनानिमित्त वर्ध्यातील हिंगणघाट येथे झेंडावंदन करून घरी जात होत्या.
त्यावेळेस ट्रिपल सीट रेसर बाईकचा ताबा सुटला आणि मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रॅव्हल्सने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की तिन्ही तरुणी ट्रॅव्हल्सच्या चाकाखाली आल्या तिघीही ट्रॅव्हल्सखाली चिरडल्या गेल्या. ज्यात तीन कॉलेज तरुणींचा जागीच मृत्यू झाला आहे. समृद्धी रुपक धामसे (वय 15 वर्षे), आरुही राजू चवरे (वय 17 वर्षे) आणि मिसबा जावेद शेख (वय 17 वर्षे) अशी या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या तरुणींची नावे आहेत.
हिंगणघाट येथील बिडकर कॉलेज जवळ हा भीषण अपघात घडला. दरम्यान अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणीना हिंगणघाट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले जिथे तिघींवर उपचार सुरू होत. मात्र तीन तरुणींचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने हिंगणघाटमध्ये शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. तर स्वातंत्र्यदिनीच अशी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.