जालना : कुटुंबातील लगान भावाच्या लग्नाची लगबग सुरु असल्याने आई-वडिलांना काहीही न सांगता अचानक गावी पोहोचून त्यांना सपप्राईज देण्याचा निर्णय घेतला. मात्र, जालन्याकडे निघालेला हा प्रवास समृद्धी महामार्गावर एका भीषण अपघातामुळे कायमचा दु:खद आठवणीत बदललाय चालकाला डुलकी लागल्याने भरधाव वेगात असलेली कार समोरुन जाणाऱ्या ट्रकवर जोरदार आदळली आणि एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सुखी संसार क्षणात उद्ध्वस्त
ही संपूर्ण हृदयद्रावक घटना शनिवार, 26 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजण्याच्या दरम्यान समृद्दी महामार्गाच्या नागपूर कॉरिडोरवरील वेरुळ या पपिसरात घडली. या अपघातात प्रतीक रामकिसन जगदाळे (वय35), त्यांची पत्नी श्रेया (वय32) आणि त्यांचा अवघ्या सात वर्षांचा मुलाचा देखील मृत्यू झालेला आहे. हे तिघेही मुळशी पुणे येथील रहिवासी होते.
अपघात कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक हे आयटी अभियंता होते. ते पत्नी आणि आपल्या मुलासह शुक्रवारी पहाटे पुण्यातील मुळशी येथून जालनाच्या दिशेने निघाले होते. लहान भावाच्या लग्नाच्या नियोजनासाठी कुटुंबीय गावी जाणार होते. आई-वडिलांना न सांगता अचानकच घरी पोहोचून सर्वांना आणि त्यांना सरप्राईज देण्याचा त्यांचा विचार होता. मात्र, समृद्दी महामार्गावर हा आनंदाने सुरु झालेला प्रवास अचानक काळरात्र ठरला.
प्रतीक यांच्या ताब्यातील कार जेव्हा चॅनेल क्रमांक 449 जवळ पोहोचली असता चालकाला डुलकी लागली आणि वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी पुढे एक ट्रक जात होता. कारने याच ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग हा पूर्णपणे ट्रकच्या खाली घुसला आणि वाहनाचा चक्काचूर झाला.
हेही वाचा-Palghar News : काही लोक झोपेत, काही कामात… अन् अचानक पालघर हादरलं; रात्री 10.33 वाजता काय घडलं?
संबंधित अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि मदत पथक हे घटनास्थळी दाखल झाले. तिघेही कारमध्ये गंभीर अवस्थेत अडकले होते. क्यूआरव्हीच्या मदतीने गॅस कटरच्या मगतीने कारचा पत्रा कापून तिघांना बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. या घटनेमुशे जालना आणि मुळशी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.