कांद्याला भरघोस दर, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण

कांद्याला भरघोस दर, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण

चाकण मार्केटमध्ये कांद्याला भरघोस दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. पन्नास ते साठ पिशवी कांदा आणणाऱ्या शेतकऱ्यांना कांद्याच्या प्रतवारीनुसार दोन ते चार लाख रुपये मिळत आहेत. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण बाजारात कांद्याची या आठवड्यात एकूण 2 हजार 920 क्विंटल आवक झाली.

मागील आठवड्याच्या तुलनेत ही आवक 420 क्विंटलने वाढूनही भावात 1 हजार रुपयांची वाढ झाली.

प्रती क्विंटलला चांगल्या प्रतीच्या कांद्याचा कमाल भाव 7 हजार रुपयांवरून 8 हजार रुपयांवर पोहोचलाय.

चाकण मार्केटमध्ये पहिल्या प्रतीच्या कांद्याला प्रतीक्विंटलला 8 हजार रुपये, दुसऱ्या प्रतीच्या कांद्याला 6,500 रुपये तर तिसऱ्या प्रतीच्या गोलटी चिंगळी अशा कांद्याला देखील 2500 रुपये असा प्रती क्विंटलला दर मिळत आहे.

दरम्यान मार्केटमध्ये चांगला भाव मिळत असल्याने काही शेतकरी पूर्ण वाढ न झालेला कांदाही मार्केटमध्ये आला आहे.

मात्र कांद्याची आवक कमी असल्याने अशा पूर्ण वाढ न झालेल्या कांद्याला देखील भरघोस भाव चाकणच्या कांदा मार्केटमध्ये मिळत आहे. किरकोळ बाजारात कांदा प्रतवारी नुसार 60 ते 80 रुपये किलोदराने विक्री होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version