मुंबईतील अत्यंत मानाचा समजला जाणारा आणि नवसाला पावणारा बाप्पा’ अशी ख्याती असलेल्या ‘लालबाग राजा’ या बहुमानाच्या गणपतीचे पाद्य पूजन बुधवारी पार पडले. संकष्ट चतुर्थी निमित्ताने सकाळी ६ वाजता चिंचपोकळी येथील मूर्तीकारांच्या कार्यशाळेत अगदी मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यंदा मंडळाने कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साधेपणाने हे पाद्यपूजन केल्याने सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे. यंदा लालबागच्या राजाचे ९० वे वर्ष आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.