Kolhapur Government Hospital: ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच दारूच्या नशेत; रुग्णांच्या जीवाशी खेळ, धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याच्या वर्तनामुळे रुग्णाला तातडीचे उपचार न मिळाल्याचा आरोप समोर आला आहे.

Kolhapur Government Hospital: ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरच दारूच्या नशेत; रुग्णांच्या जीवाशी खेळ, धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

कोल्हापूर: शासनाकडून नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी विविध योजना आणि रुग्णालये उभारली जात असताना, पन्हाळा ग्रामीण रुग्णालयातील एका धक्कादायक घटनेने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पन्हाळा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी दिगंबर टोणपे हे मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले.

रुग्णाला उपचार न मिळाल्याचा आरोप

पन्हाळगडावर आलेल्या एका पर्यटकाला अचानक चक्कर आल्याने त्याचे नातेवाईक त्याला तातडीने पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, त्या वेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी योग्य स्थितीत नसल्याने रुग्णाला तातडीचे उपचार मिळू शकले नाहीत, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

हेही वाचा: Dowry Crime: हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा क्रूर प्रयत्न, जाळल्यानंतर विषारी इंजेक्शन देऊन संपवलं

व्हिडीओ व्हायरल

या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांचा व्हिडीओ काढला. व्हिडीओध्ये डॉक्टरांना स्वतःचे नाव नीट सांगता येत नसल्याचे दिसत असून त्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर ठरला आहे.

कोल्हापूरला हलवला रुग्ण

उपचार न मिळाल्यामुळे नातेवाईकांनी संबंधित रुग्णाला तातडीने कोल्हापूर येथील दुसऱ्या रुग्णालयात हलवले. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे सरकारी रुग्णालयांमधील कामकाज, जबाबदारी आणि रुग्णांशी होणारी वागणूक यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

हेही वाचा: Pune Crime : ‘स्वर्ग’च्या नावाखाली अमानवीय खेळ; पुण्यातील महाविद्यालयाजवळ सेक्स रॅकेट उघड, 3 पुरुष आरोपी अटकेत

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number