Parth Pawar Clean Chit : 1800 कोटींच्या जमीन खरेदी-गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना ‘क्लीन चीट’?

पार्थ पवार यांना मुंढवा जमीन खरेदी-गैरव्यवहार प्रकरणात क्लीन चीट देण्यात येण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणात पार्थ पवार यांच कुठेही नाव नसल्याचा फायदा त्यांना होऊ शकतो.

Parth Pawar Clean Chit : 1800 कोटींच्या जमीन खरेदी-गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांना ‘क्लीन चीट’?

पार्थ पवार यांना मुंढवा जमीन खरेदी-गैरव्यवहार प्रकरणात क्लीन चीट देण्यात येण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणात पार्थ पवार यांच कुठेही नाव नसल्याचा फायदा त्यांना होऊ शकतो. तसेच पार्थ पवार यांची कुठेही स्वाक्षरी देखील नसल्याचं विकास कार्य समितीच्या अहवालातून स्पष्ट झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना क्लिन चीट मिळण्याची शक्यता आहे. पुण्यातील बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या 1886 पानांच्या विस्तृत आरोपपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची नावे गायब असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित शीतल तेजवानी यांच्यावरच सर्व ठपके ठेवण्यात आल्याने पार्थ पवारांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा- Ajit Pawar plane Crash Case: दादांच्या अपघाताचं गूढ अखेर उलघडणार! सहा दिवसांच्या तपासणीनंतर ब्लॅक बॉक्सबद्दल मिळाली महत्त्वाची माहिती
नेमका काय आहे 1800 कोटींचा घोटाळा?
पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील मुंढवा-कोरेगाव पार्क भागातील एका मौल्यवान भूखंडाबाबत गंभीर आरोप आहेत. 1800 कोटी रुपये बाजारमूल्य असलेला भूखंड अवघ्या 300 कोटींत ‘अमेडिया’ कंपनीने खरेदी केल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणात इतर लोकांवर गुन्हे दाखल झाले असले, तरी मुख्य सूत्रधार असलेल्या पार्थ पवारांना का वाचवले जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number