Divya Shinde Big Boss Marathi : बिग बॉस मराठी विरोधात उच्च न्यायालयात याचिका, दिव्या शिंदेचा बिग बॉसवर आरोप

सध्या जोरदार चर्चेत असलेला 'बिग बॉस मराठी 6' च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.

Divya Shinde Big Boss Marathi : बिग बॉस मराठी विरोधात उच्च न्यायालयात याचिका, दिव्या शिंदेचा बिग बॉसवर आरोप

सध्या जोरदार चर्चेत असलेला ‘बिग बॉस मराठी 6’ च्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. ‘बिग बॉस मराठी 6’ च्या घरात असलेली दिव्या शिंदेला नॅशनल टेलिव्हिजनवर हिंसेची भाषा केल्याचा ठपका ठेवत बाहेर काढलं गेलं. “बाहेर गेल्यावर तलवार चालवेन” या एका वाक्यावरून दिव्याला ‘बिग बॉस मराठी 6’ च्या घरातून हाकलण्यात आलं. त्यानंतर दिव्याने बिग बॉसच्या ‘क्रिएटिव्ह टीम’वर गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन थेट निर्मात्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. एका रिअ‍ॅलिटी शोच्या सेटवर नक्की काय चालतं, याचे दिव्याने खुलासे केले आहेत. दरम्यान बिग बॉस फेम दिव्या शिंदे शोमधून बाहेर आल्यानंतर आता “ मराठी बिग बॉस” विरोधात मुंबई हाई कोर्टात याचिका दाखल करणार आहे. बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यानंतर बिग बॉसच्या घरात दिव्या शिंदेला संविधान विषयी बोलण्यास मनाई केली असल्याचा दिव्या शिंदेने आरोप केला आहे. दरम्यान यावर आता काय निकाल लागतो हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number