Sunday, November 16, 2025 05:43:04 PM

Pik Vima Yojana : पीक विमा योजनेत मोठे बदल, सरकारच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना काय फायदा?

सरकारने पीक विमा योजनेत मोठे बदल जाहीर केले असून, यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. नव्या सुधारणांनुसार विमा प्रक्रिया सुलभ करण्यात आली असून भरपाई मिळण्याचा कालावधी कमी करण्यात आला आहे

pik vima yojana  पीक विमा योजनेत मोठे बदल सरकारच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना काय फायदा

महाराष्ट्रामध्ये यावर्षी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतीसाठी महत्वाच्या असणाऱ्या राज्यात मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी झाली. महाराष्ट्रात मराठवाडा, सांगली, सातारा अशा भागात मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान केले आहे. यामुळेच आता सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 

सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक योजनेमध्ये मोठा बदल केला आहे. केंद्र सरकारने आता 'हवामान आधारित विमा योजना' सुरू करण्याचा विचार केला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसाने होणाऱ्या पीक नुकसानाला कमी करण्याचा आणि शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करण्याच्या उद्दिष्टांना साध्य करता येऊ शकते. 

हेही वाचा - Kisan Vikas Patra: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची खास योजना; लहान रक्कम गुंतवा आणि मिळवा लाखोंचा नफा 

हवामान बदलाचा मोठा परिणाम शेतीवर होतो. त्यामुळे शेतीसंबंधित व्यवसायांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना लवकर मदत होणे गरजेचे असते. त्यामुळे एकंदरीतच परिस्थिती पाहता केंद्र सरकारने ही योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. बदलत्या हवामानाचे संकट पार करण्यासाठी हवामान आधारित विमा योजना उपायकारक ठरू शकते. 

हेही वाचा - Rabi Crops MSP Hike: मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट! गव्हाच्या किमान आधारभूत किमतीत केली ‘एवढी’ वाढ

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अर्थ मंत्रालय आणि विमा कंपन्यांमध्ये चर्चा सुरु झाली असून लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, कोणत्याही भागात अपेक्षेपेक्षा कमी किंवा जास्त पाऊस झाल्यास, तपमानाने ठराविक मर्यादा पार केल्यास तसेच वाऱ्याचा वेग मर्यादेपेक्षा वर गेल्यास विमा कंपण्याकडून स्वयंचलितपणे भरपाईची रकम देण्यात येईल.


सम्बन्धित सामग्री