Wednesday, November 19, 2025 01:57:14 PM

Bandra-Worli Sea Link Tunnel: नवी मुंबई विमानतळासाठी वांद्रे-वरळी सी लिंक व बीकेसीला बोगद्याद्वारे जोडण्याची योजना सुरू

हा उपक्रम विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांची गर्दी कमी करणे आणि सुरळीत कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

bandra-worli sea link tunnel नवी मुंबई विमानतळासाठी वांद्रे-वरळी सी लिंक व बीकेसीला बोगद्याद्वारे जोडण्याची योजना सुरू

Bandra-Worli Sea Link Tunnel: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला (NMIA) वांद्रे-वरळी सी लिंक आणि वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) यांशी जोडणारा प्रस्तावित बोगदा बांधण्याचा सविस्तर व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. हा उपक्रम विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर प्रवाशांची गर्दी कमी करणे आणि सुरळीत कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. वर्षाला 2 कोटी प्रवाशांना सेवा देण्यासाठी डिझाइन केलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत करणार आहेत. 

हेही वाचा - Mumbai Metro 3 : ॲक्वा लाईनचा मुंबईकरांना होणार 'हा' सर्वात मोठा फायदा! वाचा मार्ग आणि प्रमुख वैशिष्ट्ये

प्राप्त माहितीनुसार, विमानतळाची पहिले व्यावसायिक उड्डाण डिसेंबर 2025 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे मुंबईच्या विद्यमान विमानतळावरील ताण कमी होईल. तसेच हे विमानतळ पश्चिम भारतातील एक प्रमुख विमान वाहतूक केंद्र बनण्याची शक्यता आहे. विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर रस्ते वाहतुकीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असल्याने, मुंबई आणि नवी मुंबईमधील वाहतूक व्यवस्था मजबूत करण्याची सरकारची योजना आहे. तथापी, यावेळी एकनाथ शिंदे यांनी विमानतळाला उपनगरीय रेल्वे, मेट्रो कॉरिडॉर आणि जलमार्गांशी जोडणारी एकात्मिक वाहतूक परिसंस्था तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

हेही वाचा - Navi Mumbai Airport: पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन; पहिलं उड्डाण कोणती एअरलाईन करणार?

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाचे म्हातार्डी बुलेट ट्रेन स्टेशन, कोपर रेल्वे स्टेशन आणि तळोजा मेट्रो स्टेशन यासारख्या प्रमुख प्रादेशिक वाहतूक बिंदूंशी एकात्मता साधण्याचे निर्देश दिले. सध्या विकासाधीन म्हातार्डी स्टेशन, बुलेट ट्रेन, उपनगरीय रेल्वे, मेट्रो मार्ग आणि महामार्गांना जोडणारा हा बोगदा भविष्यात बहुआयामी, एकात्मिक वाहतूक केंद्र म्हणून कार्य करणार आहे, ज्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेवर दबाव कमी होईल आणि प्रवाशांना जलद व सोयीस्कर कनेक्टिव्हिटी मिळेल.


सम्बन्धित सामग्री