Navi Mumbai Airport: पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन; पहिलं उड्डाण कोणती एअरलाईन करणार?

विमानतळ आता उड्डाणांसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Navi Mumbai Airport: पंतप्रधानांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन; पहिलं उड्डाण कोणती एअरलाईन करणार?

ठाणे : उलवे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्या हस्ते येत्या 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री तसेच राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार असून कार्यक्रमासाठी भव्य तयारी सुरू आहे. 
विमानतळ आता उड्डाणांसाठी पूर्णपणे सज्ज झाले आहे. नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) परवाना मिळाल्यामुळेच विमानतळाच्या व्यावसायिक कार्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
1. ऑक्टोबर अखेरीला होणार तिकीट विक्री सुरु
प्रवासाची सुरुवात: विमानतळाचे उद्घाटन झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस तिकिटांच्या विक्रीला सुरुवात होईल. मात्र, प्रत्यक्ष प्रवासी वाहतूक आणि व्यावसायिक उड्डाण सेवा डिसेंबर 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. 
2. डिसेंबरमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचंही होणार उड्डाण
सेवा सुरू: विमानतळावरून देशांतर्गत (National), आंतरराष्ट्रीय (International) आणि मालवाहू (Cargo) विमानांची उड्डाणे डिसेंबर 2025 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Under Sea Tunnel: मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील समुद्राखालील बोगदा जपानच्या 'सेकान' बोगद्याला देणार टक्कर; काय असेल खास? जाणून घ्या

3. पहिल्या उड्डाणासाठी इंडिगोनं दाखवली तयारी
पहिली एअरलाईन: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सेवा सुरू करणारी इंडिगो (IndiGo) ही पहिली विमान कंपनी ठरण्याची शक्यता आहे.
उड्डाणांची संख्या: इंडिगोने सुरुवातीला दररोज 18 उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही उड्डाणे देशातील 15 प्रमुख शहरांसाठी असतील, ज्यात दिल्ली, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद यांसारख्या शहरांचा समावेश आहे.
इतर कंपन्या: इंडिगोसोबतच अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस यांसारख्या प्रमुख विमान कंपन्यांनीही नवी मुंबई विमानतळावरून सेवा सुरू करण्यात स्वारस्य दाखवले आहे.
4. सुरक्षा व्यवस्था: उद्घाटनानंतर विमानतळ परिसर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे (CISF) सोपविण्यात येईल. सुरक्षेच्या नियोजनासाठी CISF ला साधारणपणे 45 दिवसांचा कालावधी लागू शकतो. यानंतरच प्रवासी वाहतूक सुरू होईल.
दुसरा टप्पा: पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू होईल आणि ते 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

हेही वाचा – Thane – Borivali Tunnel: ठाणे ते बोरिवलीपर्यंत प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, अंतर अवघ्या 12 मिनिटांत पार करता येणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number