Wednesday, February 18, 2026 06:30:58 PM

Sanjay Raut : "हे ढोंग उघड पडलंय...त्यांची विश्वासार्हता संपली" मनसेचा शिंदेंना पाठिंबा; कल्याणमधील प्रकारावरुन राऊत संतापले

नव्या आघाडीमुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच चर्चत आले. आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी काल घडलेल्या अनेक घडामोडींवर भाष्य केलं आहे.

sanjay raut  quotहे ढोंग उघड पडलंयत्यांची विश्वासार्हता संपलीquot मनसेचा शिंदेंना पाठिंबा कल्याणमधील प्रकारावरुन राऊत संतापले

आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी काल घडलेल्या अनेक घडामोडींवर भाष्य केलं आहे. ज्यात त्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेत झालेल्या शिवसेना शिंदे गट आणि मनसेच्या युतीवर खडेबोल सुनवले आहेत. तसेच मुंबईतील ठाकरेंच्या गटातील पहिल्या नगरसेविका सरिता म्हस्के शिंदेसेनेत गेल्याच्या चर्चांवर देखील संजय राऊत यांनी झाडाझडती घेतली.  दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना काही लोक घेऊन जात असल्याचं दिसत आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. 

हेही वाचा- Raj & Uddhav Thackeray : 'मनसेने असं का केलं? त्यांनी हा निर्णय घ्यायला नको होता' मनसेच्या 'त्या' निर्णयावर उद्धव ठाकरे नाराज; नेमकं प्रकरण काय?
यावेळी संजय राऊत म्हणाले की, "ज्योतिष पिठाचे शंकराचार्य यांना ज्या पद्धतीने त्यांच्यासोबत हिंदुत्ववादी योगी सरकारने त्यांना स्नानाला जाण्यापासून रोखल, त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, ते उपोषणाला बसले आहेत. ते हिंदुत्ववादी सरकारविरोधात आंदोलन करत आहेत, त्यांच्या अंगावर भगवे वस्त्र आहेत, मोदींच्या अंगावरही तेच वस्त्र... महाराष्ट्रात स्वामी मुक्तेश्वरानंद मातोश्रीवर आले, तेव्हा त्यांना राज्य अतिथीचा दर्जा दिला, त्यांना वर्षावर बोलावलं, चरण धुतले... बाळासाहेब ठाकरेंचे हेच कसे वारसदार यांच्याकडून वदवून घेतलं. एकनाथ शिंदे यांच्या गुरु वर हल्ला झाला तरी ते गप्प बसले, त्यांच्यात हिम्मत नाही, प्रदीर्घ मुख्यमंत्री राहावे असे आशीर्वाद घेतले त्यांच्यावर हल्ला होतो शिंदे गप्प बसले असते. बाकी ठिकाणी झालं असतं तर तापलेल्या वाटण्यासारखे उडाले असते. आम्ही त्यांना भेटण्यावर विचार करू. आम्ही हे ढोंग उघड पडलंय. मुलायम सिंह यादव यांना तुम्ही माफ केले नाहीये, पालघर तुम्ही विसरले नाही. आम्ही निषेध केला आहे, निषेध करावाच लागेल." 

हेही वाचा- Chandrapur District Politics: चंद्रपूरचं राजकारण तापलं; वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील 'कोल्ड वॉर' थांबवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचे शर्थीचे प्रयत्न
पुढे कल्याण-डोंबिवली राजकारणावर संजय राऊत म्हणाले की, "शहा काटशह च्या राजकारणात नतिमत्ता ओंडक्या सारखी वाहून जाऊ नये. राज ठाकरे यांना ही भूमिका मान्य नाही, ही गोष्ट त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर लक्षात आली. आमची भूमिका शिंदेंच्या बाबतीत कठोर आहे. तिथे भाजप आणि शिंदे मिळून महापौर बनवू शकत होते, इतरांना घेण्याची गरज नव्हती. त्यांना आम्ही निर्णय मागे घेण्याचा नाही सांगणार, अंतर्गत चर्चा होईल. अशा प्रस्तावना आम्ही केराची टोपली दाखवतो, आम्ही सोबत जाणार नाही. ही माहिती उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा होती, त्यांनी मला ही माहिती दिली, आताही काय पडद्यामागे होतंय हेही माहिती. त्यांचा स्वतंत्र पक्ष, अशा प्रकारची युती मराठी माणसांना मान्य नाही. कणकवलीमध्ये सर्वपक्षीय आघाडी झाली. KDMC नगरसेवक प्रस्ताव आला तर विचार करू. शेवटी निर्णय हा मातोश्रीवर होईल, राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे, ज्यांनी हा निर्णय घेतला स्थानिक पातळीवर, त्यांची विश्वासार्हता संपली आहे. विकास हा शब्द भोंदू आणि ढोंगी, विकास या शब्दावर आता बंदी आली पाहिजे, विकास हा शब्द मोदी आणि फडणवीसांच्या काळात विकास हा बदनाम झाला. गोडसे हा शब्द इनपर्लिमंटरी आहे तसंच विकास हा शब्द करावा. बाळासाहेबांचा आणि भाजपाचा काही संबंध नाही आणि शिंदेंचा देखील नाही. निवडून आलेला माल ताबडतोप बाजारात विकायला येतो. हे काचेच्या कपाटात लेबल लाऊन उभे आहेत. " 

हेही वाचा- Chhatrapati Sambhajinagar : 'त्या' कथित ऑडिओ क्लिपबाबत आमदार नारायण कुचे यांचे स्पष्टीकरण; म्हणाले 'याप्रकरणी करणार अब्रू नुकसानीचा दावा'
नव्या आघाडीमुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलेच चर्चत आले. दुसरीकडे ठाकरेंच्या गटाला मुंबईत मोठा धक्का बसला असून प्रभाग 157 मधून निवडून आलेल्या डॅा सरिता म्हस्के शिंदे गटाच्या गळाला लागल्याची माहिती समोर आली. सेना भवनातील बैठकीला डॅा सरिता म्हस्के गैरहजर असल्याची माहिती सुत्रांद्वारे मिळाली होती. यावर, "डॉ. म्हस्के आज उद्या आमच्या गटात नोंदणी करतील, त्यांना कोणीही पळवून नेले नाही, kidnapped केले नाही. त्या व्यक्तिगत कारणासाठी काल नव्हत्या" असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 


सम्बन्धित सामग्री