Thursday, March 12, 2026 10:22:58 PM

NCP Sunetra Pawar Video : "तुमचं बोलून झालं की निघा..." सुनेत्रा पवार यांना न बोलताच पाठवलं, पटेल आणि तटकरेंनी नेमकं काय केलं?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी एक लक्षवेधी घटना घडली.

ncp sunetra pawar video  quotतुमचं बोलून झालं की निघाquot सुनेत्रा पवार यांना न बोलताच पाठवलं पटेल आणि तटकरेंनी नेमकं काय केलं

काल 26 फेब्रुवरीला मुंबईतील वरळी डोंब या सभागृहात होणार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. याच राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आज पहिल्यांदाच सुनेत्रा पवार यांनी प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरे यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेत एक लक्षवेधी घटना घडली. सुनेत्रा पवार यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांना बोलू न देताच पत्रकार परिषद संपवली. एवढच नव्हे तर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांनी पत्रकार परिषद घेतली. 

हेही वाचा- Ncp Jay Pawar-Praful Patel : जय पवार यांनी कुठं बसावं? प्रफुल पटेल यांनी थेट दाखवून दिली जागा; Viral Video
यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये काही बातचीत झाली, ज्यात त्यांनी म्हटलं की, दादा जवळ कधी जाऊ देण्याची संधी दिली नाही, माणसांनी वहिनी जवळ तरी जाऊ द्यावं. आनंद परांस्पे म्हणाले की, तुम्ही प्रश्नं नका घेवू.... तुमचं बोलून झालं की निघा... काही बोलायचं आपलं आणि उठायचं.. पुढे प्रफुल पटेल सुनेत्रा पवार यांना म्हणाले, तुम्ही निघा... पुढे काही जण म्हणाले, हे चांगलं केलं, स्पेशली प्रश्न करू नका, म्हणा मनस्थितीत नाहीत असं सांगा, बोलायचं आपलं आणि उठायचं, हे उलटे पालटे प्रश्न विचारतील ना, प्रेशर करतील तेव्हा तुम्ही उठवा, आम्ही थांबतो इथं बाजूला, बोलू नका माईक चालू आहे, अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांची कुजबूज कॅमेरात कैद झाली आहे.  


हे सगळ सुरु असताना तेथे सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर सुनेत्रा पवार यांना सांगितलं, तुमचं स्टेटमेंट करायचं तुम्ही, त्याच्या पलीकडे आम्ही बोलू. त्यानंतर पत्रकार प्रश्न विचारण्याआधीच सगळे नेते उठले प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांना म्हटलं तुम्ही निघा, त्या गेल्यानंतर पुन्हा प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी खाली बसले. हा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

जय पवार यांनी कुठं बसावं? प्रफुल पटेल यांनी थेट दाखवून दिली जागा

आज मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार गटाचं मुंबईतील वरळी डोम येथे अधिवेशन होत. यावेळी अधिवेशनात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेतेमंडळी देखील उपस्थित होते. यात हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, नरहळी झिरवळ, छगन भुजबळ, सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, जय पवार आणि पार्थ पवार हे उपस्थित होते. यावेळी प्रफुल पटेलांनी केलेली एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. दिवंगत नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार कार्यक्रमादरम्यान स्टेजवर येताच प्रफुल पटेल यांनी जय पवारांना कुठे बसाव हे सांगितलं आहे. यामुळे प्रफुल पटेलांची ही कृती पुन्हा राजयकीयवर्तूळात नवं वादळ घेऊन येते का? अशी शक्यता वर्तावली जात आहे. 

 

 

 


सम्बन्धित सामग्री