Rohit Pawar: ‘प्रफुल पटेल, तटकरेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घ्यायचा होता…’; रोहित पवारांचा गंभीर आरोप

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या 18 दिवसांतच प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्ष बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे.

Rohit Pawar: ‘प्रफुल पटेल, तटकरेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ताबा घ्यायचा होता…’; रोहित पवारांचा गंभीर आरोप

Rohit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमधील (अजित पवार गट) अंतर्गत संघर्ष आता टोकाला पोहोचला असून आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत खळबळजनक कागदपत्रे सादर केली आहेत. 28 जानेवारी 2026 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघ्या 18 दिवसांतच प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी पक्ष बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे. सत्तेसाठी झालेल्या या छुप्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, रोहित पवारांनी या प्रकरणाला आता ‘अघोरी’ वळण दिले आहे.

निवडणूक आयोगाकडे ‘ते’ संशयास्पद पत्र आणि अधिकार बळकावण्याचा प्रयत्न
रोहित पवारांच्या दाव्यानुसार, अजितदादांच्या मृत्यूनंतर 16 फेब्रुवारी 2026 रोजी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला एक गुप्त पत्र पाठवले होते. या पत्राद्वारे पक्षाच्या संविधानात परस्पर बदल केल्याचे भासवून, अध्यक्षांच्या अनुपस्थितीत सर्व अधिकार कार्यकारी अध्यक्षांकडे (Working President) राहतील, अशी तरतूद करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी प्रफुल पटेल हेच या पदावर होते. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना अंधारात ठेवून केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे. याची कुणकुण लागताच सुनेत्रा पवारांनी आयोगाला पत्र लिहून, ‘मी अध्यक्ष होईपर्यंतचा कोणताही पत्रव्यवहार वैध मानू नका,’ अशी विनंती करत या डावाला लगाम घातला.

जय पवारांचा आवाज दाबला? आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर प्रश्न
रोहित पवारांनी केवळ पत्रावरच नाही, तर इतरही गंभीर मुद्द्यांवर बोट ठेवले आहे. अजितदादांचे सुपुत्र जय पवार सत्य समोर आणण्यासाठी पत्रकार परिषद घेणार होते, मात्र प्रफुल पटेल आणि काही भाजप नेत्यांनी दबाव तंत्राचा वापर करून त्यांचा आवाज दाबल्याचा संशय रोहित पवारांनी व्यक्त केला. तसेच, ज्या VSR कंपनीच्या विमानात अपघात झाला, त्याच कंपनीला अपघातानंतर 80 ते 90 कोटी रुपये का दिले गेले? असा सवाल विचारत त्यांनी या आर्थिक व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली आहे.

हेही वाचा – Ashok Kharat Case : खरातचं गुन्हेगारी क्षेत्रातील पहिलं हत्याकांड ते अनेक बड्या अधिकाऱ्यांना 2 कोटी देणं; राष्ट्रवादीच्या नेत्याचा सनसनाटी दावा

काळी जादू, घातपाताचा संशय आणि ‘झिरो एफआयआर’
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक वळण म्हणजे ‘अघोरी’ कृत्यांचा उल्लेख. अजितदादा जिवंत असतानाच त्यांच्या निवासस्थानाबाहेर नाशिकच्या एका भोंदूबाबाच्या मदतीने ‘काळी जादू’ (Black Magic) किंवा संशयास्पद पूजा करण्यात आली होती का? असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. हा अपघात होता की नियोजित घातपात, याची सखोल गुन्हेगारी चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाच्या निष्पक्ष तपासासाठी रोहित पवारांनी राहुल गांधी यांच्या सल्ल्यानुसार कर्नाटकात जाऊन ‘झिरो एफआयआर’ दाखल केला असून, आता ही कायदेशीर लढाई अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number