चर्चेचा मार्ग स्वीकारा; मनोज जरांगेंच्या उपोषणावर प्रताप सरनाईक यांचे संयमाचे आवाहन

मनोज जरांगेंच्या नियोजित उपोषणावर प्रताप सरनाईक यांनी संयमाचे आवाहन केले असून, चर्चेच्या मार्गातून मराठा आरक्षणाचा तोडगा काढावा, असे मत व्यक्त केले.

चर्चेचा मार्ग स्वीकारा; मनोज जरांगेंच्या उपोषणावर प्रताप सरनाईक यांचे संयमाचे आवाहन

सोलापूर: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजू लागला आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हे 29 ऑगस्टपासून मुंबईत उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर दौऱ्यात माध्यमांशी संवाद साधत मनोज जरांगे यांना उपोषण न करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, आंदोलनाऐवजी चर्चेतून हा प्रश्न सोडवावा आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा.

प्रताप सरनाईक म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना, मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. त्या मागण्या विविध समित्यांच्या माध्यमातून पुढे नेण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा उपोषणाचा मार्ग न स्वीकारता, चर्चा हीच योग्य वाट आहे. राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. म्हणून मनोज जरांगे यांनी संयम ठेवून, चर्चेचा मार्ग स्वीकारावा.

याच वेळी सरनाईक यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनाही सूचनात्मक सल्ला दिला. त्यांनी म्हटले की, महाराष्ट्रात सर्व समाज एकत्र राहत आहेत. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तणाव निर्माण होणे राज्याच्या हिताचे नाही. त्यामुळे दोन्ही बाजूंनी संयम बाळगून चर्चा करून या वादाला तोडगा काढावा.

हेही वाचा:अभ्यासाच्या नावाखाली फसवणूक; फ्लॅटमध्ये कोंडून मुलीचा विनयभंग

सरनाईक यांचा सोलापूर दौरा मध्यरात्री झाला. ते धाराशिव जिल्ह्यातून येऊन रात्री अकराच्या सुमारास सोलापुरात दाखल झाले. त्यांनी शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्या कार्यालयाचे उद्घाटन केले आणि नंतर शिवस्मारक सभागृहात शिवसैनिकांच्या मेळाव्यालाही उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी राजकीय घडामोडींबाबत चर्चा केली.

मनोज जरांगे यांचे आंदोलन हे मराठा आरक्षणासंदर्भातील जनतेच्या भावना अधोरेखित करणारे आहे, हे नाकारता येणार नाही. मात्र सरकारकडून वेळोवेळी प्रयत्न होत असून, आता यासंदर्भात निर्णायक पाऊले उचलण्याची गरज आहे. अशा वेळी समाजातील प्रमुख नेत्यांनी संयम राखून संवादाच्या माध्यमातून तोडगा काढणे हीच योग्य दिशा आहे. प्रताप सरनाईक यांनी दिलेले हे आवाहन समाजातील एकी आणि शांततेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number