Thursday, November 13, 2025 08:27:00 AM

Starlink Demo Run: भारतात स्टारलिंकच्या लाँचिंगची तयारी पूर्ण! 30-31 ऑक्टोबर रोजी मुंबईत घेण्यात येणार डेमो

स्पेसएक्सने मुंबईत तीन ग्राउंड स्टेशन तयार केली आहेत, तर चेन्नई आणि नोएडा येथे गेटवे स्टेशन बसवण्याची परवानगी मिळाली आहे. भविष्यात कंपनी 9 ते 10 गेटवे स्थापन करणार आहे.

starlink demo run भारतात स्टारलिंकच्या लाँचिंगची तयारी पूर्ण 30-31 ऑक्टोबर रोजी मुंबईत घेण्यात येणार डेमो

Starlink Demo Run: एलोन मस्क यांच्या स्टारलिंक सॅटेलाइट इंटरनेट कंपनीने भारतात प्रवेशासाठी अंतिम टप्प्यात तयारी सुरू केली आहे. 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या डेमो रनमध्ये स्टारलिंक आपली सुरक्षा आणि कायदेशीर इंटरसेप्शन क्षमता प्रदर्शित करणार आहे. या प्रात्यक्षिकादरम्यान भारतीय कायदा अंमलबजावणी संस्था (LEA) स्टारलिंक नेटवर्क भारतीय सुरक्षा मानकांचे पालन करते की नाही, हे तपासतील. स्पेसएक्सने मुंबईत तीन ग्राउंड स्टेशन तयार केली आहेत, तर चेन्नई आणि नोएडा येथे गेटवे स्टेशन बसवण्याची परवानगी मिळाली आहे. भविष्यात कंपनी 9 ते 10 गेटवे स्थापन करणार आहे.

हेही वाचा - दिल्लीत Cloud Seeding चा प्रयोग फ्लॉप? पाऊस न पडण्यावर IIT कानपूरच्या वैज्ञानिकांचे स्पष्टीकरण; 'या' कारणाने तात्पुरता ट्रायल थांबवला

दरम्यान, IN-SPACE आणि DoT कडून परवानग्या मिळाल्याने कंपनीचा आत्मविश्वास वाढला आहे. स्टारलिंकला GMPCS परवाना (20 वर्षांसाठी वैध) मिळाला असून, भारत सरकारच्या सुरक्षा अटींनुसार नेटवर्कची चाचणी घेतली जाईल. सरकारने मे 2024 मध्ये सॅटेलाइट इंटरनेट कंपन्यांसाठी नवीन सुरक्षा नियम लागू केले. त्यानुसार सर्व गेटवे भारतात असणे बंधनकारक आहे.  

हेही वाचा - China Data Center: चीनने पाण्याखालील बांधले जगातील पहिले डेटा सेंटर, वैशिष्ट्ये वाचून आश्चर्यचकित व्हाल

स्टारलिंकचा खर्च 

स्टारलिंकचे कनेक्शन घेण्यासाठी प्रारंभी सुमारे 30 हजार रुपये सेटअप खर्च, आणि अंदाजे 3300 मासिक शुल्क आकारले जाण्याची शक्यता आहे. एंट्री-लेव्हल प्लॅनसाठी 25 Mbps, तर प्रीमियम प्लॅनसाठी 225 Mbps पर्यंत स्पीड मिळू शकतो. शहरी नव्हे, तर ग्रामीण आणि दुर्गम भागांना इंटरनेट पोहोचवणे हा स्टारलिंकचा हेतू आहे. भारतातील डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरू शकतो.
 


सम्बन्धित सामग्री