Protest Against Shaktipeeth Mahamarg : ‘शक्तीपीठ महामार्ग रद्द करा!’, शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; कोल्हापूरमध्ये विराट जनआंदोलन

कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करण्यासाठी आज, मंगळवारी कोल्हापूरमध्ये आंदोलन केले जात आहे. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आंदोलकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये छत्रपती शाहू महाराज, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि काँग्रेस नेते सतेज पाटील हे सहभागी झाले आहेत. या मोर्चासाठी ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आम्हाला आत्महत्या करायला लागली तरी चालेल, […]

Protest Against Shaktipeeth Mahamarg : ‘शक्तीपीठ महामार्ग रद्द करा!’, शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा; कोल्हापूरमध्ये विराट जनआंदोलन

कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाचा विरोध करण्यासाठी आज, मंगळवारी कोल्हापूरमध्ये आंदोलन केले जात आहे. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आंदोलकांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये छत्रपती शाहू महाराज, शेतकरी नेते राजू शेट्टी आणि काँग्रेस नेते सतेज पाटील हे सहभागी झाले आहेत. या मोर्चासाठी ग्रामीण भागातील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. आम्हाला आत्महत्या करायला लागली तरी चालेल, आमचे रक्त सांडलं तरी चालेल, मात्र आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका आंदोलनातील महिलांनी घेतली आहे. या मोर्चासाठी कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेतकरी एकटवले आहेत. सांगली जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गासाठी होणाऱ्या ड्रोन मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. खानापूर  तालुक्यातील विटा जवळील नागेवाडी, माऊली भाग्यनगर येथील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाच्या ड्रोन मोजणीस  विरोध दर्शवला आहे. शेतकरी आणि मोजणी अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली आणि नंतर मोजणी बंद पाडली गेली. त्यानंतर प्रांताधिकारी विक्रम सिंह बादल आणि तहसीलदार योगेश टोणपे यांनी  शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र आम्हाला शक्तीपीठ महामार्ग नको आहे, तर ड्रोन मोजणी कशाला करतायं, असा सवाल उपस्थित करत ड्रोन मोजणीला शेतकऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवला. यावेळी बाधित शेतकरी आणि मोजणी अधिकारी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक देखील उडाली.

हेही वाचा : Jalgaon Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं! गुजरातहून साखरपुड्यासाठी येणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, 5 जणांचा मृत्यू

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number