Sunday, February 15, 2026 07:08:50 AM

Pune Crime : निलंबनाचा सूड उगवण्यासाठी कर्मचाऱ्याने पत्नीसह रचला डाव; सहाय्यक अधिकाऱ्याला रस्त्यात गाठलं आणि…

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात निलंबनाच्या जुन्या रागातून एका सरकारी कर्मचाऱ्याने निलंबित कर्मचाऱ्यांची भररस्त्यात मारहाण केली आहे.

pune crime  निलंबनाचा सूड उगवण्यासाठी कर्मचाऱ्याने पत्नीसह रचला डाव सहाय्यक अधिकाऱ्याला रस्त्यात गाठलं आणि…

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात निलंबनाच्या जुन्या रागातून एका सरकारी कर्मचाऱ्याने निलंबित कर्मचाऱ्यांची भररस्त्यात मारहाण केली आहे. पुण्यातील एका प्राथमिक शिक्षण विभागात एका कनिष्ठ कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्याचाच राग संबंधित कर्मचाऱ्याच्या मनात खदखदत होता. 9 जानेवारी रोजी फिर्यादी अधिकारी शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोरून जात असताना निलंबित कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह मिळून पंचायत समितीच्या वरिष्ठ सहाय्यकास बेदम मारले.

वरिष्ठ सहाय्यकास आधी भररस्यात गाठले त्यानंतर त्यांना पती-पत्नी दोघांनी शिवीगाळ केली, आणि प्रशासकीय कारवाईचा सूड उगवण्यासाठी त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. दरम्यान पीडित अधिकाऱ्याने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून संबंधित कर्मचारी आणि त्याच्या पत्नीविरोधात कलम 353च्या अंतर्गत 'शासकीय कामात अडथळा' मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. 
 


सम्बन्धित सामग्री