Pune News : पुण्यात दारूबंदीचे नियम बदलले! कोर्टाचा मोठा निर्णय; गणेशोत्सवात दारू विक्रीला परवानगी?

पुणे शहरातील दारुबंदीच्या आदेशासंदर्भात न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतलेल आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासानाने लागू केलेल्या या दारुबंदीच्या आदेशात काही महत्त्वाचे बदल केले.

Pune News : पुण्यात दारूबंदीचे नियम बदलले! कोर्टाचा मोठा निर्णय; गणेशोत्सवात दारू विक्रीला परवानगी?

पुणे : पुणे शहरातील दारुबंदीच्या आदेशासंदर्भात न्यायालयाने एक मोठा निर्णय घेतलेल आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासानाने लागू केलेल्या या दारुबंदीच्या आदेशात काही महत्त्वाचे बदल हे करण्यात आलेले आहेत. त्यामुळेच पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

 पाहा काय आहे नवा आदेश
न्यायालयाच्या निर्णयानुसार, 14 सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस हा दारुबंदी लागू असणार नाही, त्या दिवशी फक्त संध्याकाळी 4 वाजेपर्यंत दारु विक्रीवर बंदी असणार आहे. त्यानंतर दारु विक्रीसाठी परवानगी देण्यात आली, त्यामुळे संबंधिक असलेल्या परवानाधारकांना 14 सप्टेंबर रोजी दुपारी  4  वाजेनंतर दारु विक्री करता येणार आहे. विशेष म्हणजे,25 सप्टेंबरचा 'ड्राय डे' हा कायम ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे या दिवशी दारु विक्री शहरात पूर्णपणे बंद राहणार आहे. गणेशोत्वाच्या मोठ्या सणादिवशी आणि विसर्जनाच्या दिवशी कायदा-सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, यासाठी प्रशासनाकडून अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.

Special Train: रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! कोल्हापूरसाठी तब्बल 4 स्पेशल गाड्यांचे नियोजन ; कुठून अन् कधी धावणार ट्रेन? जाणून घ्या वेळापत्रक

दारुबंदी असलेल्या या सर्व बदलामुळे अनेक व्यावसायिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी देखील 25 सप्टेंबरच्या ड्राय डेमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळेच या दिवशी दारुची विक्री पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर पुणे शहरातील दारुबंदीच्या नियमांबाबतचे असलेले चित्र काही प्रमाणात स्पष्ट झाले आहे. 14 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत बंदी असेल तर त्यानंतर दारुच्या विक्रीला परवानगी असेल. दुसरीकडे पाहिले तर 25  सप्टेंबरच्या दिवशी पूर्ण दिवस ड्राय डे राहणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number