Saturday, February 14, 2026 02:00:20 PM

Pune Exit Poll Result 2026 : कोण होणार पुण्याचा कारभारी? अजित पवारांना धक्का, तर भाजपची सरशी; दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून विविध ठिकाणच्‍या 23 कक्षात मतमोजणी होणार आहे. त्याचसोबत पुणे महानगरपालिकेचे काल मतदान पार पडले ज्यामध्ये 52.42 टक्के मतदान झाले आहे.

pune exit poll result 2026  कोण होणार पुण्याचा कारभारी अजित पवारांना धक्का तर भाजपची सरशी दोन्ही नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

बृहन्‍मुंबई महानगरपालिकासह 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी काल म्हणजेच 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. तर शुक्रवार, 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून विविध ठिकाणच्‍या 23 कक्षात मतमोजणी होणार आहे. त्याचसोबत पुणे महानगरपालिकेचे काल मतदान पार पडले ज्यामध्ये 52.42 टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. पुणे शहरात एकूण 15 ठिकाणी मतमोजणी होणार असून दुपारी 1 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. पुण्याचा कारभारी कोण याकडे सगळ्यांचेच लक्ष असून अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यासोबतच गणेश बिडकर,रवींद्र धंगेकर, वसंत मोरे, प्रशांत जगताप,अमोल बालवडकर, रूपाली पाटील यांच्या निकालाकडे ही सगळ्यांचेच लक्ष आहे. संपूर्ण मतमोजणी दरम्यान पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. पुणे महानगरपालिकेत 165 जागा असून यापैकी 2 जागा या बिनविरोध निवडून आल्या आहेत तर काल 163 जागांसाठी मतदान झाले आहे.


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या