पुणे: अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर आज अनेक भाविक त्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत आहेत. ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पुण्यात, ढोल-ताशांच्या पारंपारिक नृत्यात, लेझीमच्या गजरात आणि फुलांच्या उधळणीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
अशातच, दुपारी 3:23 च्या दरम्यान मानाचा पहिला कसबा गणपती आणि मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची मिरवणूक ठरलेल्या वेळेपूर्वी अलका चौकात पोहोच्याने पोलीस आणि प्रशासनांनी त्यांचे कौतुक केले. यादरम्यान, मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले. तसेच, कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी गणपती यांनी वेळ पाळल्याने अनेकांनी या मंडळांचे कौतुक केले. कसबा गणपती मूर्तीचे पारंपारिक विसर्जन दुपारी 3:55 वाजता झाले.
यादरम्यान, पुण्यातील अलका चौकात आणि लक्ष्मी रोडवर गणरायाच्या दर्शनासाठी भाविक लाखोंच्या संख्येने उपस्थित आहेत. तसेच, अनेकजण फुगड्या खेळून आणि पारंपारिक पोशाख परिधान करून गणरायाला निरोप देत आहेत. तसेच, 'गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या' घोषणांनी परिसर भक्तीमय झाला आहे. यादरम्यान, पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर पोलीस बंदोबस्तात तैनात आहेत. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी 4:10 मिनिटांनी झाले. यासह, मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीचे विसर्जन दुपारी 4:38 मिनिटांनी झाले. पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपती दुपारी 4:27 च्या दरम्यान, विसर्जनासाठी अलका चौकात दाखल झाला. तसेच, मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीचे विसर्जन सायंकाळी 5:13 मिनिटांनी पारंपारिक पद्धतीने झाला. यासह, पानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीचे विसर्जन सायंकाळी 5:45 मिनिटांनी पारंपारिक पद्धतीने झाला.