Pune Crime: शिकवणी वर्गात रक्तरंजित थरार! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Pune Crime:  शिकवणी वर्गात रक्तरंजित थरार! शिक्षक शिकवत असतानाच विद्यार्थ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

पुणे जिल्ह्यातील खेड-राजगुरुनगरमध्ये भल्या सकाळी घडलेली घटना कोणाच्याही अंगावर काटा आणणारी आहे. विद्येचे शांत आणि पवित्र वातावरण असलेल्या खाजगी शिकवणी वर्गात अचानक चाकू बाहेर आला… आणि काही क्षणांतच वर्ग रक्ताने माखला. शिक्षक शिकवत असतानाच एका विद्यार्थ्याने आपल्या वर्गमित्राच्या गळ्यावर वार केल्याने संपूर्ण क्लासमध्ये एकच गोंधळ उडाला. काही क्षणांपूर्वी एकत्र बसून अभ्यास करणारी मुलं, आणि क्षणात घडलेला हा अमानुष हल्ला हा केवळ गुन्हा नाही, तर व्यवस्थेवर निर्माण झालेला प्रश्न आहे.

जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या 16 वर्षीय विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांचे प्रयत्न अपयशी ठरले आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृत विद्यार्थी आणि हल्लेखोर दोघेही मित्र होते, दोघेही दहावीमध्ये ते शिकत होते आणि त्याच दिवशी एकाच शिकवणी वर्गात उपस्थित होते. मग अचानक असं काय घडलं? एवढ्या लहान वयात मुलांच्या हातात चाकू येतोच कसा? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झाले आहेत. हल्ल्यानंतर आरोपी विद्यार्थी दुचाकीवरून फरार झाला आहे.

हेही वाचा: Sydney Mass Shooting: सिडनी गोळीबार प्रकरणाला आंतरराष्ट्रीय किनार; इस्रायल-ऑस्ट्रेलिया तणाव वाढण्याची शक्यता

राजगुरुनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. 8 वी, 9 वी आणि 10 वीच्या मुलांचा एकत्र क्लास सुरू असताना ही घटना घडली. 13 ते 16 वयोगटातील मुलांच्या हातात शस्त्र येणं ही गंभीर बाब आहे. येथे प्रश्न फक्त एका हत्येचा नाही, तर खाजगी शिकवणी वर्गांमधील सुरक्षेचा आहे. कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही, कोणतीही तपासणी नाही, CCTV त्याठिकाणी नाही. 

ही घटना केवळ एका विद्यार्थ्याच्या मृत्यूची नाही, तर शिक्षणाच्या नावाखाली चालणाऱ्या व्यवस्थेवर उमटलेला गंभीर डाग आहे. खाजगी शिकवणी वर्गांमधील सुरक्षेचा अभाव, मुलांच्या मानसिक आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष आणि वाढती हिंसक प्रवृत्ती याकडे आता डोळेझाक करून चालणार नाही.

पोलीस तपासातून आरोपी सापडेलच, मात्र अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महाराष्ट्र सरकार, शिक्षण विभाग आणि पालकांनी तातडीने कठोर आणि ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा आज घटना राजगुरुनगरमध्ये घडील आहे, उद्या कोणत्या परिसरात? हा प्रश्न प्रत्येक पालकाला अस्वस्थ करणारा आहे.

हेही वाचा: New Guidelines For School: मुलांची सुरक्षितता सर्वोच्च; शाळांमधील ‘भीतीचे वातावरण’ संपवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा निर्णायक आदेश

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number