Pune Election 2026 : ठरलं! त्या तारखेला एकत्र येणार दोन्ही राष्ट्रवादी पक्ष, ‘पवार खेळी’ पुण्याचं राजकारण बदलणार?

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Pune Election 2026 : ठरलं! त्या तारखेला एकत्र येणार दोन्ही राष्ट्रवादी पक्ष, ‘पवार खेळी’ पुण्याचं राजकारण बदलणार?

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन मोठे शत्रू किंवा प्रतिस्पर्धी मानले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुण्यात मात्र एकाच छताखाली येण्याची चिन्हे आहेत. आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवार आणि शरद पवार यांचे गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांनी या युतीवर शिक्कामोर्तब केल्याने पुण्याच्या राजकीय गणितात मोठी उलथापालथ झाली आहे.

सुभाष जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटांच्या वरिष्ठ नेत्यांची एक महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी सामंजस्याने निवडणूक लढवण्यावर एकमत केले आहे. आता यापुढील चर्चेसाठी शरद पवार गटाकडून ज्येष्ठ नेते अंकुश काकडे आणि वंदना चव्हाण यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा: Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; वाल्मिक कराडसह आरोपींचा खटला लांबणीवर टाकण्याचा डाव निकमांनी उधळला

विशेष म्हणजे, जागावाटपासाठी दोन्ही पक्ष लवचिकता दाखवणार असून, 25 ते 26 डिसेंबर दरम्यान या ऐतिहासिक युतीची अधिकृत घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक चिन्हाबाबतही कोणताही संकोच न ठेवता 'विजय' हेच एकमेव उद्दिष्ट ठेवण्याचे दोन्ही बाजूंनी ठरवले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात हा प्रयोग अत्यंत धाडसी मानला जात आहे. जर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र आले, तर महायुती आणि महाविकास आघाडी या पारंपरिक समीकरणांचे काय होणार, हा प्रश्न निर्माण होतो. ही युती केवळ भाजपला रोखण्यासाठी आहे की राष्ट्रवादीची शक्ती पुन्हा एकवटण्यासाठी, हे येणारा काळच ठरवेल.

पुण्यातील या संभाव्य 'राष्ट्रवादी युती'मुळे महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांच्या अस्तित्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका बाजूला शरद पवार गटाने अजित पवारांसमोर 'ठाकरे गटा'लाही सोबत घेण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांची कोंडी होण्याची शक्यता आहे. जर राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि ठाकरे गट पुण्यात एकत्र आले, तर भाजपसाठी आपले गड राखणे कठीण जाईल. मात्र, ज्या कार्यकर्त्यांनी गेल्या दोन वर्षांत एकमेकांविरुद्ध संघर्ष केला, ते आता 'घड्याळ' की 'तुतारी' यापैकी कोणत्या चिन्हाचा प्रचार करणार, हा मोठा पेच आहे.

हेही वाचा: Kolhapur Election 2026: सतेज पाटलांचा 'कोल्हापुरी' दणका; महायुतीला टोला आणि महापालिकेसाठी काँग्रेसची नवी टॅगलाईन लाँच

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number