Devendra Fadnavis: ‘नराधमाला यमसदनी पाठवण्याचा प्रयत्न सरकार करेल’; नसरापूर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका, आणखी काय म्हणाले?

आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत असून या घटनेमुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

Devendra Fadnavis: ‘नराधमाला यमसदनी पाठवण्याचा प्रयत्न सरकार करेल’; नसरापूर प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका, आणखी काय म्हणाले?

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. 65 वर्षीय आरोपीने केलेल्या या अमानुष कृत्यात चिमुकलीचा मृत्यू झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर नागरिकांसह विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.

या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “हे प्रकरण आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होईल,” असे त्यांनी सांगितले. जनतेतून ‘भर चौकात फाशी’ची मागणी होत असली, तरी लोकशाहीत कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “या नराधमाला शिक्षा व्हावी यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल. त्याला यमसदनी पाठवण्याचा प्रयत्न सरकार करेल.” त्यांनी न्यायप्रक्रिया वेगाने पूर्ण करून पीडितेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा: Strait of Hormuz: ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ पुन्हा सुरू होणार? इराणचा अमेरिकेला चर्चेसाठी नवा प्रस्ताव; अमेरिकेसमोर ठेवल्या ‘या’ कडक अटी

दरम्यान, या घटनेवरून विरोधकांनीही सरकारवर टीका केली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वी सरकारवर निशाणा साधत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर आल्यानंतर नागरिकांकडून लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एकूणच, या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, कठोर आणि तातडीच्या उपाययोजनांची गरज अधोरेखित होत आहे. 

हेही वाचा: Pune Crime: पुणे पुन्हा हादरलं! आधी नसरापूर, म्हाळुंगे आता चाकण; 11 वर्षाच्या मुलीबरोबर 32 वर्षीय नराधमाने केलं गैरकृत्य

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number