सातासमुद्रापारचे पाहुणे पुण्यात गरब्यात रमले; पारंपरिक वेशभूषेने वेधलं लक्ष

Pune Navratri Celebration : पुण्यातील पंचशील सोसायटीत नवरात्रोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. गरबा आणि दांडियाच्या तालावर परदेशी नागरिकही थिरकले. इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनीतील नागरिकांच्या सहभागामुळे उत्सवाला आंतरराष्ट्रीय रंग चढला असून, भारतीय संस्कृतीचा आनंद अनुभवताना ते दिसले.
पुणे नवरात्रोत्सव
Pune Navratri Celebration

पुण्यातील पंचशील सोसायटीमध्ये नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून गरबाच्या तालावर चक्क परदेशी नागरिकही थिरकल्याचे पाहायला मिळालेले आहे. इंग्लंड,फ्रान्स आणि जर्मनीहून आलेल्या नागरिकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत गरबा आणि दांडियाचा मनसोक्त आनंद लुटला.

ढोल-ताशांच्या गजरात आणि गाण्यांच्या तालावर ठेका धरत त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भारतीयांचा उत्साह आणि एकोपा पाहून परदेशी नागरिक भारावून गेले होते. भारतीय संस्कृतीचा हा रंगबिरंगी उत्सव अनुभवणे अविस्मरणीय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. ”आमच्या देशात असा उत्साह पाहायला मिळत नाही. गाण्याच्या तालावर सर्वांसह नाचण्याचा आनंदच काही वेगळाच आहे” असे सांगत त्यांनी नवरात्रोत्सवाचे कौतुक केले. त्यांच्या सहभागामुळे सोसायटीतील उत्सवाला वेगळीच रंगत आलेली आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version