Wednesday, June 18, 2025 02:26:23 PM

Pune: वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून पोलीस हवालदार बेपत्ता

पुणे ग्रामीण पोलीस दलातील इंदापूर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विष्णू केमदारणे बेपत्ता झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

pune वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून पोलीस हवालदार बेपत्ता

पुणे : पुणे ग्रामीण पोलीस दलातील इंदापूर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस हवालदार विष्णू केमदारणे बेपत्ता झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी पहाटेपासून इंदापूर पोलिस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून विष्णू केमदारने बेपत्ता झाले आहेत. पोलीस हवालदार केमदारणे यांनी लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली असून या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलीस दलामध्ये जर अशा पद्धतीचे प्रकरण घडत असतील तर सर्वसामान्यांचे प्रश्न कसे मार्गी लागतील आणि इंदापूर पोलीस ठाण्यात नेमकं चाललय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून हवालदार विष्णू केमदारणे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तुझी नोकरी व यापुढील आयुष्य उध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून माझ्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे असे हवालदार केमदारणे यांच्या पत्नीने सांगितले.  तशी चिठ्ठीत विष्णू केमदारणे यांनी लिहिलेल आहे असं त्यांच्या पत्नीने सांगितले. त्याचबरोबर त्यांनी मोबाईलचे कॉल रेकॉर्डिंग देखील पाठवले आहे. माझ्या नवऱ्याला पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, पोलीस हवालदार रासकर, पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांनी मानसिक त्रास दिलेला आहे. यामुळेच माझे पती निघून गेले आहेत. माझ्या नवऱ्याला न्याय मिळावा नाहीतर मी माझ्या मुलाबाळासहित आत्महत्या करीन असे बेपत्ता झालेल्या विष्णू केमदारणे यांच्या पत्नी प्रियंका केमदारणे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कारागृहात निर्मित वस्तूंच्या विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन

पोलीस हवालदार विष्णू केमदारणे हे आज पहाटे इंदापूर वसाहतीतून बेपत्ता झाले असल्याची तक्रार इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यानुसार आम्ही चार पथके नेमून त्यांचा शोध घेत आहोत. जर यामध्ये कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांनी सांगितले आहे.


सम्बन्धित सामग्री