Prashant Jagtap Video : ‘मी पक्षात असलो काय, नसलो काय, पक्षाचं नुकसान…’; नाराज प्रशांत जगताप यांच्या भावना व्यक्त, आजच घेणार अंतिम निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.

Prashant Jagtap Video : ‘मी पक्षात असलो काय, नसलो काय, पक्षाचं नुकसान…’; नाराज प्रशांत जगताप यांच्या भावना व्यक्त, आजच घेणार अंतिम निर्णय

पुणे: राज्याच्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहणाऱ्या पुणे शहरात आता एक मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपल्या पदाचा राजीनामा खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे दिला असल्याची माहिती समोर आली असून, यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांचे गट एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असतानाच, या युतीला कडाडून विरोध करणाऱ्या जगतापांनी घेतलेला हा पवित्रा नेमका कोणत्या दिशेने जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत जगताप यांनी हडपसर मतदारसंघातून झुंजार लढत दिली होती. या निवडणुकीत त्यांचा सामना अजित पवार गटाचे चेतन तुपे यांच्याशी झाला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत जगताप यांना 1,27,688 मते मिळाली होती, तर तुपे यांनी 1,34,810 मते मिळवत निसटता विजय मिळवला होता. अवघ्या 7,122 मतांच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागल्याने जगताप यांची राजकीय ताकद सिद्ध झाली होती.

मात्र, आता महापालिका निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांमुळे जगताप नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी यापूर्वीच “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मी राजीनामा देईन” असा स्पष्ट इशारा दिला होता, जो आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana: सरकारचा ‘अपात्र’ बहिणींवर सर्जिकल स्ट्राईक! 40 लाख महिलांच्या हप्त्यावर संक्रांत? तुमचे नाव तर नाही ना?

या वादाला आणखी फोडणी मिळाली ती महापालिका निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या नवीन समितीमुळे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा करण्यासाठी शरद पवार गटाने एक समिती गठीत केली आहे. या समितीत माजी खासदार वंदना चव्हाण, प्रवक्ते अंकुश काकडे आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, शहराध्यक्ष असूनही प्रशांत जगताप यांना या प्रक्रियेतून बाजूला सारल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर जगताप यांनी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक घेऊन राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

आता सर्वांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत. राजीनाम्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर खुद्द शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांना भेटीसाठी मुंबईला बोलावले आहे. आज संध्याकाळी मुंबईत ही महत्त्वाची भेट होणार असून, तिथे जगतापांची मनधरणी केली जाणार की ते आपल्या निर्णयावर ठाम राहणार, याचा फैसला होईल.

प्रशांत जगताप यांनी जय महाराष्ट्र न्यूज सोबत संवाद साधताना सांगितले, ” पक्षाच्या चौकटीत राहून निर्णय घेणार आहे, मी कायम शरद पवार यांच्यावर प्रेम केले आहे.” पुढे ते म्हणाले “मी पक्षात असलो काय, नसलो काय, पक्षाच नुकसान होईल असे काही विधान मी करणार नाही, ज्यांनी माझ्यावर विश्वास  ठेवला त्यांचावर अन्याय होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेत आहे, सुप्रिया सुळे यांच्या सोबत बोलणी करूनच अंतिम निर्णय घेत आहे” असे त्यांनी सांगितले. आज दुपारपर्यंत ते या संदर्भातील अंतिम निर्णय कळवणार आहेत. 

दरम्यान, जगताप हे काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात, अशी जोरदार अटकळ बांधली जात आहे. पक्षातला एक गट त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असला तरी, स्वाभिमानासाठी जगताप टोकाचे पाऊल उचलणार का, हा सस्पेन्स कायम आहे.

हेही वाचा: BMC Election 2026: BMC जागावाटपाचा ‘वर्षा’ पॅटर्न; 150 जागांवर एकमत, 77 जागांवरुन संघर्ष; मुंबईच्या राजकारणात आजची दुपार ठरणार निर्णायक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number